टीम मंगळवेढा टाईम्स ।
Binance, Kucoin, OKX यासह अनेक क्रिप्टो प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट्स देशात ब्लॉक करण्यात आल्या आहेत. डिसेंबर २०२३ च्या अखेरीस, अर्थ मंत्रालयानं Binance सह ९ ऑफशोअर व्हर्च्युअल डिजिटल असेट्स सर्व्हिस प्रोव्हायडर्सना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाही त्यांचे URL ब्लॉक करण्यास सांगितलं होतं. स्थानिक मनी लाँडरिंग कायद्यांचं पालन न करता भारतात बेकायदेशीरपणे कार्यरत असल्याचं समजलेल्या URL ब्लॉक करण्याचे निर्देश दिले.
या सूचनेच्या अनुषंगाने ही पाऊलं उचलली आहेत. अर्थ मंत्रालयानं Binance, Kucoin, Huobi, Kraken, Gate.io, Bittrex, Bitstamp, MEXC Global आणि Bitfinex यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Binance, Kucoin, OKX यासह यापैकी काही क्रिप्टो प्लॅटफॉर्म भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी देशातील अॅपल अॅप स्टोअरमधून
हे क्रिप्टो प्लॅटफॉर्म काढून टाकण्यात आले होते. याची पुष्टी करताना, Binance च्या कस्टमर सपोर्ट हँडलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भातील माहिती दिली आहे.
“आम्हाला एका IP ब्लॉकची माहिती आहे जी Binance सह अनेक क्रिप्टो फर्मवर परिणाम करत आहे. याचा परिणाम फक्त अशा युझर्सवर होत आहे जे भारतातून iOS अॅप स्टोअर किंवा Binance वेबसाइटला अॅक्सेस करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ज्या वापरकर्त्यांकडे आधीच Binance अॅप आहे त्यांच्यावर परिणाम होणार नाही,” असं त्यां नी यात म्हटलंय.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज