टीम मंगळवेढा टाईम्स।
हवामान विभागाकडून १३ एप्रिल रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे; मात्र त्यानंतर पावसाची शक्यता नाही. त्यामुळे रविवार १४ एप्रिलपासून तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. तसेच ‘यलो’ अलर्ट देण्यात आला होता. या अंदाजानुसार शहर व जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. काही दिवस ढगाळ वातावरण होते.
त्यामुळे तापमानात सतत आठ दिवस घट झाल्याचे पाहायला मिळाले. १३ एप्रिलपर्यंतच पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे इथून पुढे तापमानात वाढ होईल अशी शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
मंगळवेढ्याला अवकाळी पावसाचा फटका, वीज पडून तीन शेळ्यांचा मृत्यू; वादळी वाऱ्याने २१ घरांवरील पत्रे उडाल्याने नुकसान
मंगळवेढा तालुक्यात वादळी वाऱ्याने भाळवणी, मरवडे, तळसंगी, डिकसळ येथील एकूण २१ नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने अक्षरशः संसार उघड्यावर आला आहे.
दरम्यान या घटनेत भाळवणी येथील घराच्या पत्र्यावरील दगड एक मूल व आई यांच्या अंगावर पडल्याने ते दोघे जखमी झाले आहेत, तसेच रेवेवाडी येथे वीज पडून शेळी व दोन पिल्ले मृत्यू पावली आहेत.
दिवसभर कडाक्याचे ऊन व सायंकाळी वादळ असा निसर्गाचा गेली दोन दिवस ऋतुचक्र सुरू आहे. संध्याकाळी सुटलेल्या वादळी वाऱ्याने भाळवणी २, मरवडे ४, डिकसळ १०, तळसंगी ५ असे एकूण २१ जणांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याने संबंधित कुटुंबीयांना रात्र निसर्गाच्या छायेखाली काढावी लागली.
दरम्यान रेवेवाडी येथील येडोबा देवकते यांच्या घराच्या समोर बांधलेल्या शेळ्याच्या अंगावर वीजा पडल्याने एक शेळी व दोन पिल्ले मृत पावली आहेत. महसूल विभागाने या सर्व घटनांचा पंचनामा करून नैसर्गिक आपत्ती विभागाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.
वादळी वाऱ्याने भाळवणी भागातील वीज वितरणचे पोल मोडून पडल्याने ग्रामस्थांना वीज अभावी रात्र अंधारात काढावी लागली. वादळी वाऱ्याचा वेग भयावह असल्याने आंब्यांच्या बागांचे नुकसान झाले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज