टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आमदार समाधान आवताडे गटाच्या
मंजुषा भीमराव आसबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच रेखा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेविका संगीता माने सचिव आज ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली. या सभेत मंजुषा आसबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येणारी विकास कामे, दलित वस्तीतील प्रलंबित कामे, गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊन स्वच्छ तामदर्डी व सुंदर तामदर्डी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस मंजुषा आसबे यांनी बोलून दाखविला आहे.
याप्रसंगी सरपंच रेखा बाळू शिंदे, ग्रामसेवक संगीता माने, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर पुजारी, सोसायटी चेअरमन मोतीराम पुजारी, तम्मा काका पुजारी,
माजी पंचायत समिती सदस्य वीरप्पा पुजारी, प्रगतशील बागायतदार राजकुमार आसबे, बळी शिंनगारे, पैलवान श्रीमंत रंगांना पुजारी, सुभाष होनमाने, मनोज कुमार आसबे, काशिनाथ पुजारी,
धनंजय पवार, अवधूसिद्ध देवाप्पा पुजारी, अवधूसिद्ध सुलताना पुजारी, ग्रामपंचायत सदस्य चेतन पुजारी, सुवर्णा पुजारी, अभिमान शिंदे, द्रौपदी पुजारी, नवनाथ शिनगारे,
अण्णा शिंनगारे, सुयश आसबे, मनोजकुमार आसबे अंगद आसबे आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंच मंजुषा आसबे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज