टीम मंगळवेढा टाइम्स ।
मदरशात शिकणाऱ्या दहा वर्षीय मुलावर मौलानाकडून अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नांदेडमधील वाघी रोड हस्सापुर येथे दार – ए – अरखांम नावाने चालवल्या जाणाऱ्या मदरशात ही घटना घडलीये.
दरम्यान, पीडित मुलाच्या कुटुंबियाच्या तक्रार दिल्यानंतर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मौलाना महोमद शाहनवाजकडून 10 वर्षीय मुलावर नैसर्गिक अत्याचार
अधिकची माहिती अशी की, मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या एका दहा वर्षीय मुलावर मौलानाने अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. नांदेडमध्ये ही घटना घडली. नांदेड शहराजवळच्या वाघी रोड हस्सापुर येथे दार – ए – अरखांम नावाने मदरसा चालवला जातो.
या मदरशात जवळपास तीस मुल निवासी राहून धार्मिक शिक्षण घेतात .. अन्य मौलानासह मूळचा बिहार येथील 26 वर्षीय महोमद शाहनवाज हा मौलाना देखील मुलांना शिक्षण देतो.
दोन दिवसापूर्वी आरोपी मौलाना महोमद शाहनवाज याने एका दहा वर्षीय मुलावर नैसर्गिक अत्याचार केले .. त्रास होत असल्याने पीडित मुलाने मदरशाबाहेरील पानटपरी चालकाला हा प्रकार सांगितला .. आणि मौलानाचे बींग फुटले ..
दोन्ही फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
पीडित मुलाच्या कुटुंबियाच्या तक्रारीवरुन आरोपी मौलाना शाहनवाज सह मदरसा चालक मौलाना अय्युब खासमी विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
मदरसा चालकाने आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्याला सहआरोपी करण्यात आले .. दरम्यान दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
पुण्यात चॉकलेटचे अमिष दाखवून 60 वर्षीय नराधमाकडून 2 चिमुकल्यांवर अत्याचार
दरम्यान, पुण्यात दोन दिवसांपूर्वी मुलींवर लैंगित अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात 60 वर्षीय नराधमाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत.
चॉकलेट देण्याचं आमिष दाखवून शेजारी राहणार्या 60 वर्षीय नराधमाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणीत नरधमाला अटक करण्यात आली होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज