मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारच्या वतीने एक दिलासादायक पाऊल उचलण्यात आले आहे. एक प्रकारे संपूर्ण राज्यात या उपक्रमाची शेतकऱ्यांकरता प्रगतीचं पाऊल म्हणून पाहिलं जातं.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेल्या बुलढाण्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमा अंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख 18 हजार 582 केशरी रेशनकार्ड धारक शेतकऱ्यांच्या समावेश झालेला नाही.
या शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम देण्यासाठी 3 कोटी 71 लाख 55 हजार 540 रुपयांचा निधी शासनाने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांना उपलब्ध करून देण्याचा शासने मान्यता दिली आहे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यासह शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिक धारक शेतकऱ्यांना धान्य ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ जानेवारी 2023 पासून देण्यात येत आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अन्नधान्यांच्या वितरणाचा प्रक्रियेतून मुक्तता मिळाली आहे. आणि त्या ऐवजी आता त्यांना थेट रोख रक्कम मिळत आहे. ज्यांना राष्ट्रीय धान्य सुरक्षा अधिनियम अंतर्गत अन्नधान्य मिळत नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांना खाद्य सुरक्षेची गॅरंटी मिळण्याचा एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.
नेमका काय होणार फायदा, कसा राबवला जाणार?
बुलढाणा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या संख्येमुळे कायम चर्चेत राहिलेला आहे. शेतीतील अनिश्चितता, उत्पादनावर पडणारे हवामानाचे संकट आणि बाजारातील अस्थिरता यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नगदी दिलासा महत्त्वाचा आधार ठरणार आहे.
शासनाच्या या उपाययोजनामुळे थेट रोकड हस्तांतरणामुळे पारदर्शकता वाढेल, शेतकऱ्यांना तातडीची मदत उपलब्ध होईल आणि त्यांच्या कुटुंबाचे अन्नसुरक्षेचे प्रश्न काही प्रमाणात कमी होतील. हा निर्णय बुलढाणा सारख्या जिल्ह्यांसाठी मोठा दिलासा असून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण घटवण्यासाठी व ग्रामीण समाजात आशा निर्माण करण्यासाठीही तो महत्त्वाचा ठरू शकतो.
शेतकऱ्यांना कसा फायदा होणार?
शेतकऱ्यांना धान्य ऐवजी नगदी पैसा देण्याचे अनेक महत्वपूर्ण फायदे आहेत. सर्वप्रथम, पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्यामुळे त्यांना त्याच्या गरजेनुसार खर्च करता येतो. त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यात वाढ होते आणि त्यांनी उत्पन्नवाढीसाठी शेतीशी संबंधित आधुनिक साधने, बियाणे, खते किंवा इतर व्यवसायात गुंतवणूक करणे शक्य होते.
आर्थिक लवचिकता नगदी पैसा मिळाला की शेतकरी कोणत्याही गरजेवर लगेच खर्च करू शकतो, जसे की आरोग्य, शिक्षण, शेतीचा विस्तार, बियाणे/खते घेणे किंवा कर्जफेड. धान्याच्या स्वरूपात मिळणाऱ्या मदतीमध्ये अनेक अडचणी येतात. पैसा शेतकऱ्यांच्या हाती आला की स्थानिक बाजारपेठ, दुकानदार, सेवाकेंद्रे यांना चालना मिळते; त्यामुळे गावाच्या अर्थव्यवस्थेत गती निर्माण होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज