mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट! ‘या’ दिवसापासून राज्यातील मंदिरे,धार्मिकस्थळे उघडणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 14, 2020
in राज्य
वारकऱ्यांच्या लढ्याला यश! दिवाळीनिमित्त श्री विठ्ठल मंदिराचे महाद्वार उघडले

गेल्या काही महिन्यांपासून मंदिरं सुरू करण्याच्या सुरू असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी धार्मिकस्थळं उघडण्याची घोषणा करून दिवाळी निमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे.

पाडव्यापासून मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडत आहोत, असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील धार्मिकस्थलळं उघडण्यात येत असल्याची घोषणा केली.

मंदिरं सुरू करण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहनही केलं आहे.

दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही.

राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही.

इतकेच नाही तर इतर धर्मीयांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच, असं सांगत यापुढेही शिस्तीचं पालन करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंदी असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉयच्या रूपाने ‘देव’ पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, पण आता उद्याच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सगळ्यांना करावेच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळा व स्वतःबरोबर इतरांचे रक्षण करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं’ ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका.

मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील!, असंही त्यांनी म्हटलं आहे

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंदिर उघडलीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 11, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 11, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 11, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 10, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार नको, १ लाखाचा लाभ द्या; ​उपसरपंच बालाजी गरड यांची शासनाकडे आग्रही मागणी ​

March 7, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 6, 2026
Next Post

छावा युवक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रवीण घाडगे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पंढरपुरात खळबळ

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा