टीम मंगळवेढा टाईम्स ।
भाजपाचे २० ते २५ आमदार फोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव होता. हे कारस्थान करताना माझाही कार्यक्रम करण्याचा विचार सुरू होता. पक्ष गेला शिवसैनिक गेले याबद्दल त्यांना काही घेणे देणे नव्हते, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
भाजपच्या चार-पाच मोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कार्यक्रम तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी हाती घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची पूर्ण तयारी तेव्हा करण्यात आली होती.
मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. मला हे सगळे कारस्थान हाणून पाडायचे होते आणि जनतेने जो भाजप शिवसेनेला कौल दिला होता ते सरकार स्थापन करायचे होते म्हणून बंडाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.(स्रोत:लोकमत)
बाळासाहेबांना नको ते उद्धव यांनी स्वीकारले
बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना खरी शिवसेना आहे. धनुष्यबाण आमच्याकडे आहे. बाळासाहेब ठाकरेंना नको होते तेच उद्धव ठाकरेंनी स्वीकारले. ठाकरे यांच्याकडून काँग्रेसची भाषा बोलली जात आहे.
सावरकरांबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी कधी तडजोड केली नाही. त्यामुळे नकली शिवसेना हे केलेले वक्तव्य खरे आहे. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज