टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावात दोन तरुणांनी गळफास घेऊन ऐन दिवाळीत आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे 21 वर्षीय तरूणाने शेतातील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली असून ही घटना दि.22 रोजी घडली आहे.
दरम्यान तेजस रामचंद्र लवटे असे मयताचे नाव आहे. या घटनेची पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत तेजस लवटे याने दि.22 रोजी सकाळी 9.00 च्या सुमारास शामराव लवटे यांच्या शेतातील बांधावरील लिंबाच्या झाडाला अज्ञात कारणावरून गळफास घेवून आत्महत्या केली.
याची खबर मयताचे वडील रामचंद्र रावसाहेब लवटे यांनी पोलिसात दिली आहे.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
मुढवी येथे तरूणाची दारूच्या नशेत गळफास घेवून आत्महत्या
मंगळवेढा तालुक्यातील मुढवी येथे 35 वर्षीय तरूणाने दारूच्या नशेत राहते घरामध्ये पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
वैजिनाथ अंबादास रोकडे असे आत्महत्या करणार्या युवकाचे नाव असून या घटनेची मंगळवेढा पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील मयत वैजिनाथ रोकडे याने दि.21 च्या पहाटे 4.30 वा.राहते घरामध्ये पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने दारूच्या नशेत गळफास घेवून आत्महत्या केली.
याची खबर नागनाथ रोकडे यांनी पोलिसात दिली असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत असून याचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज