टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा शहर व परिसरात सायंकाळी बिगर मोसमी पावसाने ढगांचा गडगडाट व वीजांचा कडकडाट करीत सुमारे तासभर हजेरी लावल्याने रस्ते जलमय झाल्याचे चित्र होते.
दरम्यान, अकोला रोडवरील भगरे मळा येथे वीज पडल्याने दोन जनावरे मृत्यूमुखी पडून जवळपास एक लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले मंदौस चक्रीवादळामुळे थंडीच्या हंगामातही पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. गेली दोन दिवस दिवसभर ढगाळ वातावरण रहात आहे.
सोमवारी सायंकाळी ६.०० वा. अचानक मंगळवेढा शहर व परिसरात आकाशात काळेकुट्ट ढग येवून बिगर मोसमी पावसाला प्रारंभ झाला. हा पाऊस जवळपास एक तासभर पडत राहिल्याने रस्त्याच्या सखल भागात पाणी साचून राहिले होते.
ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट होत असल्याने शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची आठवण झाली. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन आर्थिक फटका बसला आहे.
महसूल विभागाने नुकसानीचे पंचानामे केले मात्र शासनाकडून अदयापही याची नुकसान भरपाई मिळाली नसताना निसर्गाने पुन्हा बळीराजाच्या पिकावर आक्रमण केल्याने शेतकरी वर्ग पुरा हतबल झाला आहे.
काळया शिवारात गेल्या तीन महिन्यापासून तळे साचल्याप्रमाणे ऊस पिकात पाणी साचून राहिल्याने अदयापही जुन व जुलै महिन्यात अडसाली लागवड केलेली ऊस पिके गाळपास गेली नसताना बिगर मोसमी पावसामुळे शेतकरी वर्ग पुरा हतबल झाला आहे.
दरम्यान, मंगळवेढा – अकोला रोडवरील भगरे मळा येथे शांतीनाथ आसबे यांची खिलार गाय व जर्सी गाय अशी दोन जनावरे अंगावर वीज पडून सायंकाळी ६.०० वा. मृत पावली. ही जनावरे वस्तीसमोरील लिंबाच्या झाडाखाली बांधली असल्याचे सांगण्यात आले.
परिणामी पशुपालकाचे अंदाजे १ लाख ४० हजाराचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मंगळवेढा पशुवैदयकिय विभागाला देण्यात आली असून सकाळी मृत जनावरांचे पंचनामे व पोस्टमाटम करण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज