टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील नामांकित असलेल्या तुळजाभवानी पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांनी नावे पावत्यावर सही न घेता, मुदत संपलेल्या व मुदत ठेवीच्या पावत्या न जोडता 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाची फिर्याद प्रशांत नामदेव सुळ, प्रथम अप्पर लेखापरीक्षक, श्रेणी 2 सहकारी संस्था पंढरपूर. यांनी दाखल केली असून,
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीकडे तुळजाभवानी पतसंस्थेच्या बँक कारभाराचे लेखापरीक्षण करण्यासाठी 1 एप्रिल 13 ते 31 मार्च 21 या कालावधीतील लेखापरीक्षण करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या कालावधीतील लेखापरीक्षण करून त्याबाबतचा अहवाल सहकारी संस्था सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा यांना सादर केला.
त्यामध्ये 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2015 या कालावधीत आढळलेल्या गंभीर त्रुटी वरून त्यांनी कार्यालयीन पत्र जावक क्रमांक 1145
दि. 22 डिसेंबर 2021 नुसार आदेश दिले त्यानुसार 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2015 या कालावधीत नावे पावत्यावर खातेदाराची सही नाव घेणे, मुदत संपलेल्या व मुदत पूर्व मोडलेल्या ठेवीच्या पावत्या न जोडता व संस्थेत जमा न करता हातावर शिल्लक कमी दाखवून हा अपहार करण्यात आला.
त्यामध्ये पिग्मी ठेव 1 लाख 37 हजार 610, सेविंग ठेव 44 हजार 503, वैयक्तिक सेविंग ठेव 88 हजार 476, मुदत ठेव 3 लाख 91 हजार 865, रोपे महोत्सव ठेव 7 हजार,
दामदुप्पट ठेव 4 लाख 9 हजार 407, ठेव व्याज 2 लाख 28 हजार 416, मुदत ठेव कर्ज 47 हजार 167, सुवर्णमहोत्सवी ठेव कर्ज 30 हजार, पिग्मी ठेव कर्ज 16 हजार,
ऑडीट फी 42 हजार, रोख रक्कम अॅडव्हान्स 31 हजार 150 हातावरील रकमेचा अपहार 2 लाख 9 हजार 699, रोख रक्कम 1 लाख 61 हजार इतक्या रकमेचा अपहार
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
तत्कालीन प्रभारी व्यवस्थापक योगेश पांडुरंग जाधव, तत्कालीन क्लार्क तानाजी जगन्नाथ मिसाळ व वीरेंद्र गोपाळ कुंभारे यांनी केला या शिवाय तत्कालीन व्यवस्थापक चंद्रकांत शिवाजी भालेराव यांनी अनामत 1 लाख 61 हजार व मुदत ठेव तारण कर्ज ओव्हरड्राफ्ट 2 लाख असा एकूण 20 लाख 44 हजार 293 या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मंगळवेढा शहर व तालुक्यात अनेक संस्थांनी आपला गाशा गुंडाळला आहे. मात्र यामध्ये अनेक ठेवीदारांचे व खातेदाराचे पैसे अडकले आहेत याबाबत आणखीन कडक कारवाई कधी होणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. (स्रोत:सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज