टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन घोषित केला होता. यातच जिल्ह्यांतर्गत एसटी सेवाही बंद करण्यात आली होती. परंतू आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. महाराष्ट्रात राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. यात एसटी सेवाही बंद करण्यात आली होती. यापूर्वी लॉकडाऊन शिथिल करतेवेळी राज्यातील उद्योग, व्यापार, दुकाने सुरू केले गेले आहे.
पण शहरी भागातून ग्रामीण भागात होणारा संसर्ग टाळावा, राज्यात जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर फक्त शेतीमाल, औद्योगिक तसेच इतर माल वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती.
नागरिकांना मात्र अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणाशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती. एसटी सेवा ही जिल्हांतर्गत सुरू होती.
पण आता एसटी ही दुसऱ्या जिल्ह्यात ही जाणार आहे. यावेळी तुम्हाला ईपासची आवश्यकता नसेल. परंतू, खासगी वाहनांना ईपास मात्र काढावा लागणार आहे.
नागरिकांना ग्रामीण भागात प्रवासासाठी प्रवासाचे प्रमुख साधन एसटी आहे. एसटीच बंद आसल्याने प्रवाशांना खासगी गाड्यांवर आवलंबून रहावे लागते. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भु्र्दंड देखील सहन करावा लागतो. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात येतो.
गणेशोत्सवासाठी नागरिकांना प्रवास करता यावा याकरिता देखील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी आहे. त्यानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळाला आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु ही वाहतूक अंशत: असल्याचे समजते. तसेच टप्प्याटप्प्याने ही वाहतूक वाढविण्यात येणार आहे.
Citizens will be able to travel from one district to another; Permission for inter-district ST travel
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज