मंगळवेढा टाईम्स न्युज ।
हळदीच्या दिवशीच चक्कर आल्याने सोलापुरातील वधूचा नाशिकमध्ये मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. दीपशिखा गिरीश गोडबोले असे २९ वर्षीय मृत वधूचे नाव आहे.

या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्या मुंबईतील दादर माटुंगा परिसरातील रुपारेल कॉलेजजवळ राहत होत्या.

दीपशिखा या माजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अॅड. गिरीश गोडबोले यांची मुलगी आणि जेष्ठ वकील एस.सी. गोडबोले यांची नात होती. लग्नाचा मंडप सजलेला ही धक्कादायक घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शनिवारी रात्री दीपशिखा आणि नातेवाइकांनी रात्रभर गाणे गात, नृत्याचा आनंद घेतला. हॉटेलमधील खोलीमध्ये नातेवाइकांसोबत असताना सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास दीपशिखा चक्कर येऊन पडल्या.

त्यांना उपस्थित नात्यातील व्यक्तीने प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

लग्नासाठी आलेल्या वन्हाडींना दीपशिखाचा अखेरचा निरोप द्यावा लागत असल्याने नातेवाईक हवालदिल झाले. गोडबोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुंबईतील गोडबोले कुटुंब राहत असलेल्या परिवारावरही शोककळा पसरली. अचानक झालेल्या या घटनेमुळे अनेकांना आपले अश्रू रोखता आले नाही.

आठवडाभरापूर्वीही दुसऱ्या वधुपित्याचा झाला होता मृत्यू
दीपशिखा यांचा विवाह गंगापूर गावापासून जवळच एका आलिशान रिसॉर्टमध्ये होणार होता. लग्नमुहूर्तासाठी तयार होत असताना त्यांना अस्वस्थ वाटतं होतं. मात्र आदल्या रात्रीचे जागरण, लग्नाची दगदग यामुळे प्रकृती वरखाली होत असल्याचा समज करून त्यांनी दुर्लक्ष केले होते.
परंतु साडेनऊ वाजताच्या सुमारास दीपशिखा चक्कर येऊन पडल्या आणि गोंधळ उडाला, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. दरम्यान, त्याच रिसॉर्टमध्ये दुसऱ्या वधुपित्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












