मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । दहा वर्षाच्या मुलीला घरामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सतीश जिल्ला (रा. सोलापूर) याच्यावर जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित बालिकेच्या आईने फिर्याद दिली आहे.
-वाचा-सोलापुरात दीड लाखांच्या बनावट नोटांसह दोघे ताब्यात
पीडित बालिकेस टीव्ही दाखवण्याचे आमिष दाखवून सतीश याने घरामध्ये नेले. घरामध्ये नेऊन अत्याचार केला. घरामध्ये खेळत असलेली मुलगी दिसत नसल्यामुळे बालिकेची आई मुलीचा शोध घेऊ लागली. घराच्या शेजारी राहणाऱ्या सतीश जिल्ला याच्या घरामध्ये ती आहे काय हे पाहण्यासाठी गेल्यानंतर घरास आतून कडी लावलेली होती. तेव्हा मुलीच्या आईने खिडकीतून हाक मारली.
– महत्वाची बातमी-माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी सरकारची ‘ही’ योजना जाहीर
त्यानंतर सतीश याने दरवाजा उघडून बालिका ही टी.व्ही.पाहात असल्याचे सांगितले. हे सांगत असतानाच बालिका ही रडतच बाहेर आली. आईने तिला घरामध्ये नेऊन विश्वासाने विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. याबाबत पीडित बालिकेच्या आईने बळजबरी करत अत्याचार केल्याप्रकरणी सतीश याच्यावर फिर्याद दिल्याने पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Advt
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज