mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिक्षक व पदवीधर आमदार निवडणुकीसाठी मंगळवेढा तालुक्‍यातील मतदारसंघांत तगडा बंदोबस्त

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 1, 2020
in राजकारण, सोलापूर
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी आज दि.१ डिसेंबर रोजी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात १५ बुथवर सकाळी ८.०० ते ५.०० या वेळेत मतदान होत असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

यान , पदवीधरसाठी ३८०७ तर शिक्षक मतदार संघासाठी ७७६ असे ४५८३ मतदार मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत.

पुणे विभागाच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मंगळवेढा शहरात पाच बुथ तर ग्रामीण आपला भागात मारापूर- २ बुथ , आंधळगांव -२ बुथ , मरवडे -२ बुथ , हुलजंती -२ बुथ , भोसे -२ बुथ असे एकूण १५ बुथवर मतदान होत आहे.

दरम्यान यामध्ये सहा शिक्षक मतदार संघासाठी तर एक पदवीधर मतदार संघासाठी बुथ आहेत . निवडणूक प्रक्रियेसाठी ८५ कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

तर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी एक पोलिस निरिक्षक, दोन पोलिस निरिक्षक , दोन पोलिस उपनिरिक्षक , ३८ पोलिस कर्मचारी, २४ होमगार्ड असा फौजफाटा नेमण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

सोलापूर जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघा अंतर्गत अक्‍कलकोट सात, बार्शी व पंढरपुरात प्रत्येकी आठ, करमाळा, मंगळवेढा व दक्षिण सोलापुरात प्रत्येकी सहा, माढा, माळशिरस, उत्तर सोलापूर व सांगोल्यात प्रत्येकी सात आणि मोहोळ तालुक्‍यात पाच मतदान केंद्रे आहेत.

तर पदवीधरसाठी अक्‍कलकोटमध्ये आठ, बार्शी, माळशिरसमध्ये प्रत्येकी 13, माढ्यात 11, मंगळवेढ्यात नऊ, मोहोळमध्ये सात, उत्तर सोलापुरात 26, पंढरपूर तालुक्‍यात 12, दक्षिण सोलापुरात सहा व सांगोल्यात 10 मतदान केंद्रे आहेत. मतदानानंतर पंढरपूर, सोलापूर व कुर्डुवाडीतून मतपेट्या पुण्याला पाठवल्या जाणार आहेत, अशी माहिती मिलिंद शंभरकर यांनी दिली.

मतदानासाठी एक हजार 970 कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत.

तर 62 क्षेत्रीय अधिकारी, 168 अधिकाऱ्यांची 42 भरारी पथके नियुक्‍त करण्यात आली आहेत. 217 सूक्ष्म निरीक्षक, 394 आशा सेविका, शहरासाठी 191 पोलिस कर्मचारी व ग्रामीणसाठी एक हजार 148 पोलिस कर्मचारी असणार आहेत.

197 मतदान केंद्रांवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांना मास्क, हॅण्डग्लोव्ह्‌ज, फेस शिल्ड दिले जाणार आहे. त्या ठिकाणी 250 थर्मल गन, हॅंडवॉश असतील, असेही जिल्हाधिकारी शंभरकर या वेळी म्हणाले.

मतदारांना मतदान यादीतील त्यांचे नाव शोधण्यासाठी सर्च इंजिन देण्यात आले आहे. सोलापूर, पंढरपूर व कुर्डुवाडी येथून मतदान साहित्य पुण्याला नेण्यासाठी 24 बस, 30 मिनी बस, 14 जीप असतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे पदवीधर व शिक्षक आमदारकीसाठी 1 डिसेंबरला मतदान होत असून, 35 शिक्षक उमेदवार तर 65 पदवीधर उमेदवार आहेत. त्यासाठी चार लाख 26 हजार 430 पदवीधर तर 72 हजार 545 शिक्षक मतदार आहेत. मतदान केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून वेटिंग रूम तयार करण्यात आल्या आहेत.

दोन मतदारांमध्ये सहा फुटांचे अंतर असणार असून 98.6 पेक्षा अधिक तापमान असलेल्या मतदाराला वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेवटच्या तासात मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. तर मतदानादिवशी शिक्षकांना नैमित्तिक रजा मिळेल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Join WhatsApp Group for Latest News

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पुणे पदवीधर मतदार संघ

संबंधित बातम्या

Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

मंगळवेढा राष्ट्रवादीत गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाजूला केले जाणार; कोण म्हणाले,वाचा सविस्तर

January 17, 2021
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ ग्रामपंचायत उमेदवाराचा मतदानादिवशीच मृत्यू

January 15, 2021
Breaking! बालविवाह लावल्याप्रकरणी आई-वडिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल

अवैध दारू विक्री, पाचजण ताब्यात: २० हजारांचा साठा जप्त

January 15, 2021
आश्चर्यकारक कलाटणी! राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात

धनंजय मुंडेंबाबत रात्री उशिरा झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा महत्वाचा निर्णय

January 15, 2021
अँड.पवार यांचा उड्डाणपुलासाठी पाठपुरावा! सुशीलकुमार शिंदे, जयसिद्धेश्‍वर महाराजांचे गडकरींना पत्र

अँड.पवार यांचा उड्डाणपुलासाठी पाठपुरावा! सुशीलकुमार शिंदे, जयसिद्धेश्‍वर महाराजांचे गडकरींना पत्र

January 15, 2021
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

सोलापूर जिल्हात राष्ट्रवादीतील लोकप्रतिनिधी निवडणुकीसाठी आपल्या गावांमध्ये तळ ठोकून

January 14, 2021
कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकीची रक्कम भरा, शेतकर्‍यांना वीज बिलात 50 टक्के माफी देण्याचा निर्णय

शेतकऱ्यांनो! विजेच्या धोक्याची माहिती द्या आता व्हॉटस्‌ऍपद्वारे, सोलापूर जिल्ह्यासाठी ‘हा’ आहे नंबर

January 14, 2021
चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

आनंदाची बातमी! कोरोना लस सोलापुरात दाखल, पहिल्या टप्प्यात ‘या’ लोकांना मिळणार लस

January 14, 2021
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

January 13, 2021
Next Post
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

मंगळवेढा शहर व तालुका पदवीधर व शिक्षक मतदार संघास महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा अग्रेसर राहिली

ताज्या बातम्या

प्रशांत गायकवाड यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

प्रशांत गायकवाड यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड

January 18, 2021
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कोंडभैरी

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर कोंडभैरी

January 18, 2021
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

मंगळवेढा राष्ट्रवादीत गटबाजी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाजूला केले जाणार; कोण म्हणाले,वाचा सविस्तर

January 17, 2021
नवा नियम! तुम्ही जर PhonePe, Google Pay, Paytm वापरत असाल तर ‘ही’ बातमी वाचा

सावधान! तुम्हालाही मिळाला आहे का असा मेसेज? गृह मंत्रालयाने जारी केला अलर्ट

January 17, 2021
काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी

मंगळवेढा ब्रेकिंग! ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच, ‘एवढ्या’ किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या जाणार

January 17, 2021
मंगळवेढ्यातील दुकानाची वेळ आजपासून ‘ही’ असणार, ‘या’ नियमांचे असणार बंधन

मंगळवेढा नगरपालिकेची हद्दवाढ होणार, बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न लवकरच मार्गी : नगराध्यक्षा अरुणा माळी

January 17, 2021
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

Join WhatsApp Group for Latest News