टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. येत्या 5 दिवसांत तीव्र हवामानाचा इशारा अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.
7 मार्चपासून महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
कोकणात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्, विदर्भात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. 7 मार्च रोजी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्हांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्यानंतरचे काही दिवस आणखीही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 मार्चनंतर पुणे, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्हांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
7 ते 9 मार्चदरम्यान महाराष्ट्र, गुजरात, पू.राजस्थान व प. मध्य प्रदेशात विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका/मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, काढणीला आलेल्या गहू, हरभऱ्यासह रब्बी हंगामातील अन्य पीकांना या वादळी पावसाचा धाेका आहे. वाऱ्यामुळे मका पिकाचे नुकसान हाेण्याची शेतकऱ्यांना धास्ती आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज