टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुणे विभागीय सेपक टकरा स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलींच्या गटात मंगळवेढ्याच्या तिन्ही संघांनी विजेतेपद मिळवले.
मंगळवेढ्याच्या इंग्लिश स्कूलने १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावत दुहेरी विजय मिळवला. येड्राव आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने १९ वर्षांखालील मुलींच्या गटात अजिंक्यपद मिळवले.
पारितोषिक वितरण डॉ. अतुल निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी सेपक टकरा असोसिएशनचे सचिव रामचंद्र दत्तू मुख्याध्यापक रवींद्र काशीद, उपमुख्याध्यापक सुनील नागणे, विठ्ठल बिले, प्रशांत यादव, दिगंबर घुले, क्रीडा शिक्षक वीरेश अंगडी, अमित जावळे, दीपक शिनगारे, अण्णा वाकडे, अमोल निकम उपस्थित होते.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात मंगळवेढ्याच्या इंग्लिश स्कूलने पुण्याच्या मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूलचा १९-२१, २१-१८, २१-१९ असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात इंग्लिश स्कूलने पुण्याच्या मातोश्री इंग्लिश स्कूलचा २१-१३, २१-१५ असा एकतर्फी विजय मिळविला.
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात येड्राव आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने शिरूर येथील गुजर प्रशालेचा २१-९, २१-१२ असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज