मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात बुधवारी एकाच दिवशी कोरोनाच्या तीन मृत्यू झाले आहेत. त्यात दोन मृत्यू मुंबईत झाले असून त्यापैकी एक ७५ वर्षीय पुरुष आहे, तर दुसरा ५१ वर्षीय पुरुष आहे. याशिवाय, पालघर येथील ५० वर्षीय पुरुषाच्याही मृत्यूची नोंद आहे.
या तिन्ही रुग्णांना परदेशी प्रवासाचा कुठलाही इतिहास नव्हता. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या १३ झाले आहेत. राज्यात बुधवारी ३३ नव्या कोरोना बाधितांचे निदान झाले. त्यात ३० मुंबईचे, पुण्याचे दोन तर बुलढाण्याच्या एका रुग्णाचा समावेश आहे.
राज्यात बुधवारी एकूण ७०५ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१२६ नमुन्यांपैकी ६४५६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत ४१ करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २४ हजार ८१८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १८२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
———————————–
◼️एकूण ३३५ बाधित
———
◼️१३ जणांचा मृत्यू
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज