टीम मंगळवेढा टाईम्स।
दारू पिण्यास पैसे मागितले असता पैसे न दिल्याच्या कारणावरून एका ४० वर्षीय महिलेस मारहाण करून गळ्यातील अर्धा तोळ्याची चेन काढून घेवून पर्समधील
दोन हजार रुपये घेवून पोबारा केल्याप्रकरणी आरोपी मिथून रजपूत काळे (रा.येड्राव ) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी शोभा शंकर पाटील (वय ४० , रा . येड्राव) ही घरात काम करत असताना आरोपी मिथून काळे याने सकाळी १०.३० च्या दरम्यान
फिर्यादीच्या घरासमोर येवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. यावर फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला असता महिलेला हाताने मारहाण करून तीच्या गळ्यातील अर्धा तोळे सोन्याची चेन काढून घेतली.
तसेच घरात टेबलवर ठेवलेल्या पर्समधील २ हजार रुपये रोख रक्कम घेवून आरोपी पळून गेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सत्यजीत आवटे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज