टीम मंगळवेढा टाईम्स । सध्या सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने लॉकडाऊन जाहीर केला असून या लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वच मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील लक्ष्मी देवीचे मंदिर हे सुद्धा भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. या संधीचा फायदा घेऊन शुक्रवारी मध्यरात्री लक्ष्मी देवीच्या अर्धा किलो चांदीच्या पादुका चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लक्ष्मी देवीचे पुजारी लाला सोनवले हे नियमित लक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी शनिवार सकाळी मंदिरात आले असताना दार उघडे दिसले, दरम्यान पुजाऱ्यांनी पोलिस पाटील मधुकर पाटील यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी तात्काळ लक्ष्मी दहिवडीतील लक्ष्मी देवीच्या मंदिरात येऊन पाहणी केली आहे.
सदर चोरीचा शोध घेण्यासाठी श्वान पथक बोलवले असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे. लक्ष्मी दहिवडीमध्ये 10 दिवसांत ही दुसरी चोरी असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडीतील लक्ष्मी देवीच्या मुख्य मंदिराचे ग्रील तोडून चोरट्यांनी देवीच्या अर्धा किलो चांदीच्या पादुका चोरीला गेल्यामुळे भाविक-भक्तांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.
या चोरीचा तपास करणं पोलिसांसमोर मोठं आवाहन आहे. मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्यासह पोलिस नाईक गणेश सोनलकर, दत्तात्रय येलपलेसह पोलिस कर्मचारी गावातील विविध किराणा दुकाना समोरील सीसीटीव्ही रात्रीपासून फुटेज चेक करत आहेत. दरम्यान, श्वान पथक बोलवले असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे.(पुढारी)
Thieves stole Lakshmi Devi’s silver shoes in Lakshmi Dahivadi
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज