मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
घराबाहेर खेळणाऱ्या मुलांना घरात घेवून जाण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण व चेन अज्ञात चोरट्याने सिने स्टाईलने काढून पळ काढला.
यावेळी सदर महिलेला फरफटत नेले. ही घटना रविवार, दि.१२ जानेवारी रोजी ६.४५ च्या सुमारास मस्के कॉलनी, एखतपूर (ता. सांगोला) येथे घडली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, रविवारी सायंकाळी पूनम संदिप गिड्ढे (वय-२८, रा- मस्के कॉलणी नं. ३, सांगोला) या घराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांना घरात घेऊन जाण्याकरीता घराच्या बाहेर रोडवर आल्या होत्या.
यावेळी त्यांच्या पाठीमागून एक नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल आली. सदर मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यदीचे मानेला धरून त्यांना ओढत नेले
व त्यांच्या गळ्यातील ८० हजाराचे २ तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण व ४० हजार रुपये किमतीचे १ तोळ्याची सोन्याची चेन असे एकूण १ लाख २० हजाराचे सोने हिसका मारून काढून नेले.
मोटासायकल वरील दोघांनी तोंडाला मास्क लावलेले होते तर मागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीस काही पावले फरफटत नेले, अशी तक्रार पूनम गिड्डे यांनी पोलिसात दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज