टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील बालाजी नगर येथे उदघाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या कोविड सेंटरमधील ब्रश , साबण , पावडर डबे , पाण्याच्या बाटल्या असा चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी खोलीचे सील तोडून चोरून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की , मंगळवेढा तालुक्यात कोरोना संसर्ग साखळीचा प्रभाव वाढत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यासाठी बालाजी नगर येथे कोविड सेंटर उभारण्यास श्री बालाजी शिक्षण मंडळ , उच्च माध्यमिक आश्रम शाळेला नग मंजूरी देण्यात आली होती.
या कोवीड सेंटरमध्ये रुग्णांना लागणारे साहित्य एक हजार रुपये किमतीचे १०० ब्रश , एक हजार रुपये किमतीचे १०० नग साबण , एक हजार रुपये किमतीचे १०० नग पावडर डबे, एक हजार रुपये किमतीचे १०० नग तेलाच्या बाटल्या असा एकूण चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल
चोरटयांनी दि.१५ ते २१ ऑगस्टच्या दरम्यान बंद खोलीत प्रवेश करून चोरून नेला असल्याची फिर्याद तलाठी विजय एकतपुरे यांनी पोलिसात दिली आहे.
या चोरीचा कसून तपास पोलिस नाईक घोळसगावकर हे करीत आहेत.
Thieves raid Covid Center awaiting inauguration; Patient material stolen
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज