टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्यामुळे शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासकामुळे विकास कामाचा खोळंबा होत आहे.
त्यामुळे प्रशासक तातडीने बदलण्यात यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
यावेळी जिल्हा संघटक, युवराज घुले जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, अर्जुन मुद्गुल, प्रभूचंद्र शिंदे, दत्ता चव्हाण, अर्जुन चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरपालिकेतील राज्यातील सत्ताधारी एकाच पक्षाचे असल्यामुळे पालिकेच्या प्रलंबित विकास कामाला कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला, मात्र सध्या ही मंजूर कामे अद्याप वेगाने होत नाहीत.
नगरपालिकेचा कार्यक्रम संपल्यामुळे शासनाने पालिकेच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या त्यामुळे पालिकेच्या कारभाराची जबाबदारी प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आले मात्र प्रशासक आल्यापासून बहुतांश विकासकामे ठप्प झाली.
याकडे प्रशासकाने गांभीर्याने याची माहिती घ्यायला हवी होती परंतु दुर्दैवाने त्यांनी या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.
शौचालयाची कामे रस्त्याची कामे पेवर ब्लॉक ची कामे घेणारे ठेकेदारांना नागरिकाकडून विचारणा केल्यानंतर आम्ही काम पूर्ण केल्यानंतर बिल निघण्याची आम्हाला खात्री नाही.
काम करण्यासाठी आम्हाला वाळू सिमेंट स्टील घेण्यासाठी रोख पैसे द्यावे लागतात काम पूर्ण झाल्याबरोबर बिल देण्याची आम्हाला प्रशासकाने त्यांच्या हातामध्ये कायद्याप्रमाणे
असेल तर लेखी द्यावे काम पूर्ण झाल्यानंतर बिल देण्यात येईल असे लेखी दिले तर ठेकेदार काम करण्यास सुरुवात करतील ठेकेदाराकडून सांगितले जाते या सर्व गोष्टींमधून मार्ग निघणे अशक्य आहे.
मंगळवेढा शहरातील रखडलेली विकास कामे चालू होतील याची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन इशारा देण्यात आला.
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या विरोधात महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांच्या मोबदला बाबत अडवणूक होते म्हणून आरपीआयचे आंदोलन झाले आहे प्रहारचे आठ दिवसाचे उपोषण झाले आहे.
या सर्व गोष्टी ठेकेदारांनी पाहिल्यामुळे काम घेतलेले ठेकेदार आपले बिल लवकर मिळणार नाही याची जाणीव त्यांना झालेली आहे यामुळे प्रशासकांना घाबरून ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत.-युवराज घुले जिल्हा संघटक स्वाभिमानी शेतकरी संघटना.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज