मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात सध्या कोरोना विषाणूचा व्हायरस झाल्याने तो रोखण्यासाठी मंगळवेढा येथील सोमवारी भरणारा आठवडी बाजार, नगरपालिका शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, क्लासेस, सिनेमागृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा तसेच गर्दी होणारे कार्यक्रम दि.31 मार्च अखेर बंद ठेवण्यात येणार असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
जीवघेणा कोरो विषाणू महाराष्ट्रात हळूहळू पाय पसरत असल्याने राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जत्रा, यात्रा, ऊरूस, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम,सांस्कृतिक कार्यक्रम टाळावेत अशा नागरिकांना सक्त सुचना केल्या आहेत. विधिवत पुजा करण्यास मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करावी. मात्र सर्व वैद्यकीय सुरक्षा बाळगणे बंधनकारक आहे. यासाठी नगरपरिषद मंगळवेढा यांची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. या आदेशाचे उल्लंघन करून गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित संयोजकाविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमनुसार कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, खोकताना-शिंकताना नाकावर रूमाल धरावा, आपले हात साबणा व पाण्याने स्वच्छ धुवावेत असे आवाहन नगरपालिकेने केले आहे.
मंगळवेढा शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शहरातील सर्व सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरूस, क्रीडा स्पर्धा, सिनेमागृहे आदिवर दि.31 मार्च अखेर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या जनजागृती साठी शहरातील मुख्य मार्गावरून रिक्षा फिरवून जनजागृती केली जात आहे. मंगळवेढयात प्रत्येक सोमवारी आठवडी बाजार भरतो. बाजार भरणार की नाही याबाबत व्यापारी व नागरिक संभ्रमात होते. मात्र नगरपालिकेने रविवारी प्रसिद्धी पत्रक काढून बाजार भरणार नसलेबाबत खुलासा केल्याने नागरिक व व्यापार्यांची शंका दुर झाली आहे.
नगरपालिका क्षेत्रातील न.पा.शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली. तर जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील सर्व शाळा चालू राहणार असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यातील पोलिस पाटील, सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक संस्था, राजकीय संस्था व सर्व विभागातील प्रशासकीय प्रमुख यांचे आज सोमवार दि.16 रोजी सकाळी 10 वाजता मंगळवेढा पोलिस स्टेशन येथे कोरोना व्हायरस संदर्भात करावयाच्या उपाययोजना या अनुषंगाने बैठक बोलावण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी दिली.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
This News First Publish on mangalwedhatimes.in®
जाहिरात:-
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज