mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सहकारी बँकांच्या कर्जाबाबत सरकार कडून कोणतीच घोषणा नाही

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सहकारी बँकांच्या कर्जाबाबत सरकार कडून कोणतीच घोषणा नाही


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । ‘महाविकास आघाडी’ सरकारने मराठवाडा व विदर्भातील सावकारी कर्ज काढलेल्या शेतकर्‍यांचे कर्ज माफ करत 65 कोटी रुपयांचा निधीही वितरित केला. मात्र, नागरी सहकारी बँकांकडून शेतकर्‍यांनी घेतलेल्या कर्जाबाबत राज्य शासनाकडून अजूनही कोणतीच घोषणा झाली नाही. त्यामुळे ‘सावकारीतून सुटले अन् नागरी बँकांत अडकले’, अशी अवस्था नागरी बँकांतून कर्ज काढलेल्या शेतकर्‍यांची झाली आहे. या बँकांचे कर्ज असलेल्या शेतकर्‍यांच्या नजरा राज्य शासनाच्या पुढील निर्णयाकडे आहेत.

‘महाविकास आघाडी’ सरकार सत्तारूढ झाल्यानंतर शेतकर्‍यांना दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला.या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अंतर्गत असलेल्या सोसायटी व राष्ट्रीय बँकांतून पीक कर्ज काढलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला.

गेल्या काही वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्यास हात आखडता घेण्यात आला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडूनही अनेकदा पात्र असतानाही शेतकर्‍यांना कर्ज वाटप करण्यात टाळाटाळ केली. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी नागरी सहकारी बँका व पतसंस्था यासारख्या रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असणार्‍या वित्तीय संस्थांकडून कृषी कर्ज घेतले. याकरिता अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी बँकेकडे तारण म्हणून गहाण आहेत.

नागरी सहकारी बँका व पतसंस्था यांच्याकडून घेण्यात आलेल्या कर्जावर शेतकर्‍यांना किमान 15 टक्क्यांपुढे व्याजदर आकारण्यात आला आहे. ज्या शेतकर्‍यांनी या वित्तीय संस्थेकडून कर्ज काढले आहे त्या शेतकर्‍यांचे कर्ज पाच वर्षांच्या कालावधीत थकीत पडले आहे. व्याज, चक्रवाढ व्याजामुळे अशा शेतकर्‍यांच्या कर्जाचा आकडा दुप्पट झाला आहे. त्यामुळे अशा बँकांतून कर्ज काढलेला शेतकरीही अत्यंत बिकट आर्थिक दुष्टचक्रात सापडला आहे. या शेतकर्‍यांना राज्य शासन दिलासा देणार की त्यांना वार्‍यावर सोडून देणार, असा प्रश्न शेतकर्‍यांतून उपस्थित होत आहे.

मराठवाडा व विदर्भातील शेतकर्‍यांनी खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा चांगला निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्वच नागरी सहकारी व सहकारी पतसंस्थांतून कृषी कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची किमान दोन लाखांची तरी कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
पीकविमा वितरणात वगळलेल्या मंडलांचा नव्याने प्रस्ताव दाखल होणार : तहसीलदार रावडे

पीकविमा वितरणात वगळलेल्या मंडलांचा नव्याने प्रस्ताव दाखल होणार : तहसीलदार रावडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 10, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा