टीम मंगळवेढा टाईम्स ।
सिलेंडर वापरकर्त्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. नवीन वर्षांत एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत घसरण झाली आहे. 1 जानेवारी 2024 पासून दिल्लीपासून मुंबईपर्यंत LPG Cylinder च्या दरात कपात करण्यात आली आहे.
ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोग्रॅम वजनाच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात केली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा सिलेंडरचे दर कमी झाले आहे. यापूर्वी 22 डिसेंबर रोजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. परंतु घरगुती सिलेंडरचे दर जैसे थे आहेत.
किती झाली दरात कपात
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडर गॅसच्या दरात कपात केली आहे. 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर एक ते दीड रुपयांनी कमी केले आहे. परंतु 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात काहीच बदल नाही.
गेल्या चार महिन्यांपासून घरगुती गॅस दर जैसे थे आहे. त्यात काहीच बदल केला गेला नाही. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाला होता.
मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर 902.50 रुपये तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1,755.50 रुपये झाली आहे. दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर 903 रुपयांमध्ये मिळत आहे. कोलकातामध्ये 929 रुपये तर मुंबईत 902.50 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळत आहे. चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर 918.50 रुपये आहे.
आजपासून राजस्थानमध्ये 450 रुपयांमध्ये सिलेंडर
भाजपने राजस्थान विधानसभा निवडणुकीत 450 रुपयांत सिलेंडर देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राज्यात 450 रुपयांमध्ये सिलेंडर मिळणार असल्याचे जाहीर केले. BPL लाभार्थीमधील महिला आणि उज्ज्वला योजनेचे लाभार्थींना हे सिलेंडर मिळणार आहे. राजस्थान सरकार महिलांना 12 सिलेंडर स्वस्तात देणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज