मंगळवेढा टाईम्स न्युज।
महाराष्ट्रात सध्या २ हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर प्रशासक कार्यरत आहेत. फेब्रुवारीत १४ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने तातडीने ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची शक्यता नाही.
त्यामुळे सरपंचांना प्रशासक नेमण्यासाठी कायद्यात बदल करून राज्यपालांचा अध्यादेश काढावा, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने मुख्यमंत्र्यांकडे तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना भेटून घेऊन केली आहे.

अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळापासून आतापर्यंत ज्या ज्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले गेले आहेत. सरपंच आणि ग्रामस्थ राबवत असलेले नतनतीन उपकम त योजना बंद पडल्या.

सध्या महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
अनेक गावांनी सहभाग घेतला आहे. सरपंच, त्यांचे सहकारी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. गावच्या स्मशानभूमी, शाळा, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा सुरू आहेत. या योजनेला मुदतवाढ मिलाली आरे सरपंच त सदस्य नसेल तर अशा योजनेला खीळ बसेल.

फेब्रुवारीत १४ हजार ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले तर अनेक गावे एकाच प्रशासकाकडे येतील, ज्यामुळे गावविकास थांबेल. मध्यप्रदेश, उत्तराखंड, झारखंड व राजस्थानमध्ये अशा परिस्थितीत सरपंचांसह संपूर्ण सदस्यांना प्रशासक नेमले आहे.
राजस्थान शासनाचा अध्यादेश व नेमणूक आदेश उपलब्ध आहेत. इतर राज्यांनी हा अधिकार दाखवून दिला असल्याने महाराष्ट्र सरकारही असा निर्णय घेऊ शकते, असे परिषदेचे म्हणणे आहे.

या मागणीचा शासनाकडून सहानभूतीपूर्वक निर्णय होऊन अंमलबजावणी व्हावी अन्यथा नाईलाजास्तव रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा सरपंच परिषेदेने शासनाला दिला आहे.

स्पर्धेमध्ये दोन हजार ग्रामपंचायती सहभागी..
महायुती सरकारने तुकडेबंदी कायद्याने बेकायदा व्यवहार कायदेशीर केले. पाणंद रस्त्यासाठी रॉयल्टी व मोजणी फी माफ केली. स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या परंपरेला पुढे घेऊन ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी पाच लाख ते पाच कोटी रुपयांचे पुरस्कार असलेल्या स्पर्धेत दोन हजार ग्रामपंचायती सहभागी आहेत. या योजनेसाठी तरी सरपंचांना प्रशासक नेमावे, अशीही मागणी सरपंच परिषदेने केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















