टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात अनुसूचीत जाती-जमातीच्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ, माराहण करणे, सार्वजनिक ठिकणी हीन वागणूक देणे या सारखे अनेक ॲट्रोसिटीचे गुन्हे पोलिसांत नोंद आहेत.
अनुसूचित जाती-जमाती या वर्गातील पीडित व्यक्तींनी ॲट्रोसिटी कायद्या अंतर्गत आरोपींविरोधात गु्न्हे दाखल केल्याची अनेक प्रकरणे आहेत. पंरतु एका महिलेने आपल्याच नवऱ्यावर पोलिसांत ॲट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा नोंदविला आहे.
पंढरपुरात हा अनोखा प्रकार घडला आहे. बायकोकडून स्वत:च्या नवऱ्यावर ॲट्रोसिटी दाखल करण्याची पहिली घटना असल्याचे बोलल जात आहे.
महिला आणि तिच्या आरोपीने काही वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. काही दिवसांपूर्वी नवरा-बायकोमध्ये वाद झाला. या दोघांचा वाद थेट पोलिसांत पोहोचला. बायकोने थेट ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामुळे हे प्रकरण नवऱ्याच्या अटकेपर्यंत पोहोचलं आहे.
काय आहे प्रकरण?
फिर्यादी व आरोपी यांचा प्रेम विवाह झाला होता. फिर्यादी महिला अनुसूचीत जाती/जमाती वर्ग समाजातील आहे. तर आरोपी इतर वर्गातील आहे. या जोडप्याला दोन मुलीही आहेत.
परंतु अलिकडे काही दिवसांपासून नवरा आणि बायकोमध्ये वादविवाद होत होते. या वादादरम्यान, नवऱ्याने जातीवरून अपमानास्पद आणि हीन वागणूक दिल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.
नवऱ्याने आपल्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप महिलेने केला आहे. यानंतर या प्रकरणाची नोंद पंढरपूर पोलीस ग्रामीण ठाण्यात झाली आहे. महिलेच्या आरोपानुसार, नवऱ्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह भारतीय दंड संविधान कलमान्वये गुन्हा दाखल झाले आहेत.
नवऱ्याने जातीवरून अपमानास्पद आणि हीन वागणूक दिली. नव-याने आपल्या इच्छेविरूद्ध लैंगिक अत्याचारही केला, अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित बायकोने नोंदविली. त्यानुसार नवऱ्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह भारतीय दंड संविधान कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी नवऱ्यास अटक केली आहे. तसेच त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
‘ती माझ्या जातीची‘
दरम्यान, अटक झाल्यानंतर आरोपीने पंढरपूर न्यायालयात ज्येष्ठ फौजदारी विधीज्ञ धनंजय माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केलाय. नवऱ्याने जामीन अर्जात म्हटलं आहे की, लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याच्या जातीची झाली. त्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्याने नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकत नाही’.
दरम्यान, याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने , ॲड. जयदीप माने ,ॲड. सिद्धेश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम, ॲड वैभव सुतार हे काम पाहत आहेत. नवऱ्याविरुद्ध बायकोने ॲट्रॉसिटी कायद्याखाली खटला दाखल करण्याची न्यायालयीन इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.(स्रोत:साम tv)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज