टीम मंगळवेढा टाईम्स।
लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 11 जणांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीने आधीच आठ उमेदवारांची घोषणा केली होती, त्यामुळे आता वंचितचे एकूण 19 उमेदवार झाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीने आणखी उमेदवार घोषित केल्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांचा पक्ष महाविकासआघाडीत सहभागी होणार का? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
महाविकासआघाडीकडून मात्र प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करू, ते महाविकासआघाडीत सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत सोलापूर, माढा, हिंगोली, मुंबई उत्तर मध्य यासह 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार
हिंगोली- डॉ. बी.डी. चव्हाण
लातूर- नरसिंगराव उदगीरकर
सोलापूर- राहुल गायकवाड
माढा- रमेश बारसकर
सातारा- मारुती जानकर
धुळे- अब्दुर रहमान
हातकणंगले- दादागौडा पाटील
रावेर- संजय पंडीत ब्राह्मणे
जालना- प्रभाकर बकले
मुंबई उत्तर मध्य- अबुल हसन खान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग- काका जोशी
याआधीही वंचित बहुजन आघाडीने 8 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात अकोल्यातून प्रकाश आंबेडकरांना उमेदवारी दिली गेली होती.
अकोला- प्रकाश आंबेडकर
भंडारा-गोंदिया- संजय केवट
गडचिरोली-चिमुर- हितेश मडवी
चंद्रपूर- राजेश बेल्ले
बुलढाणा- वसंत मगर
अमरावती- प्राजक्ता पिल्लेवार
वर्धा- राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशीम- सुभाष पवार
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज