टीम मंगळवेढा टाईम्स ।
शासकीय धान्य गोदामात शासकीय चलनाची रक्कम भरण्यासाठी 1200 रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
उत्तम वामन गायकवाड (३९ वर्षे पुरवठा निरीक्षक, तहसिल मंगळवेढा) खाजगी इसम बालाजी सिध्देश्वर यादव (वय.२५ संगणक चालक, शासकिय धान्य गोदाम मंगळवेढा) असे अटक झालेल्या दोघांची नावे आहेत.
यातील तक्रारवार यांचे मंगळवेढा शहरात वडर गल्ली येथे स्वस्त धान्य दुकान असून त्यांना प्रत्येक महिन्याला धान्याच्या चलनाची रक्कम ही
तहसिल कार्यालय, मंगळवेढा अंतर्गत असलेल्या शासकिय धान्य गोदाम मंगळवेढा येथे शासकिय रक्कम चलनाव्दारे भरावी लागते.
यातील तक्रारदार यांनी माहे मे २०२२ या महिन्यामकारक्कम भरण्याच्या अनुषंगाने शासकिय धान्य गोदाम मंगळवेढा येथील आरोपी यादव यांना भेटले असता आरोपी यादव यांनी तक्रारदार यांना
चलनाचे रक्कमे व्यतिरिक्त त्याचे स्वत: करीता २५० रुपये व साहेबांचे करीता १२०० रु अशी मासिक हप्ता म्हणून दयावी लागेल असे म्हणून लागी मागणी केली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि.१२/०५/२०२२. दि २६/०५/२०२२ दरम्यान आरोपीकडे पडताळणी कारवाई करण्यात आली असता पडताळणी कारवाई करून
आरोपी यादव यांनी वरील प्रमाणे लाच रकमेची मागणी केली दि.२६ मे रोजी यातील आरोपी गायकवाड यांचेवर पडताळणी कारवाई केली असता
कारवाई दरम्यान त्यानी आरोपी यादव यांनी मागणी केलेल्या लाच रक्कमेची मागणी करून त्यास दुजोरा दिला. आज सदर प्रकरणामध्ये सापळा कारवाई केली असता
पडताळणी कारवाई दरम्यान यांनी सदर लाचेची रक्कम आरोपी यादव देण्यास सांगुन सदरची लाच रक्कम मार्फतीने स्विकारल्यानंतर दोन्ही आरोपींना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून सविस्तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज