टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात कुंभार गल्ली येथे सीमा बुरजे व सोमनाथ बुरजे यांनी घेतलेला हळदी कुंकूचा सोहळा शहरात आदर्श ठरत असल्याचे दिसून येत आहे.
रथसप्तमी निमित्त बुरजे परिवाराने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सोमनाथ बुरजे व सीमा बुरजे हे सामाजिक बांधिलकी म्हणून परिसरातील महिला वर्गाला एकत्र करून हा सोहळा पार पाडत आहेत. महिलांचाही उदंड प्रतिसाद लाभत आहे.
कुंभार गल्ली येथे रविवारी सायंकाळी हा सोहळा पार पडला. यावेळी महिलांना वाण म्हणून संसारोपयोगी साहित्य देण्यात आले.
महिलांमधील स्नेह आणि गोडवा कायमचा टिकावा, या उद्देशाने रथसप्तमी निमित्त तिळगुळ वाटप आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बुरजे परिवाराने दरवर्षी प्रमाणे यंदाही हळदी कुंकू उपक्रम राबवित एकप्रकारे आपलेपणा जपल्याचे सीमा बुरजे यांनी यांनी सांगितले. उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी युवक नेते सोमनाथ बुरजे यांनी पार पाडली.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे करून कार्यक्रमाला खुप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सौ.सीमा सोमनाथ बुरजे यांनी सर्व महिलांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे यांनी केले.
हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सोमनाथ बुरजे मित्र परिवाराचे मोठं योगदान लाभले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज