सुरज फुगारे । शिक्षकाला मातीची भांडी घडविणार्या कलाकाराची भूमिका निभावताना विदयार्थ्यांवर सुसंस्कार,नितीमुल्ये,सकारात्मक जीवनदृष्टी याची सुंदर नक्षी उमटवायची आहे. त्यातून उदयाचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरणार आहे त्यामुळे शिक्षक स्वतः घडणारा आणि विदयार्थ्यांना घडविणारा असावा असे प्रतिपादन मंगळवेढयाचे उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी केले.
मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे सदस्य भिमराव मोरे हे संत दामाजी हायस्कूलमधून सेवानिवृत्त झालेबद्दल ,दुसरे सदस्य राजेंद्रकुमार जाधव हे संत दामाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी रूजू झालेबद्दल तर माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांची अखिल भाविक वारकरी मंडळाच्या जिल्हा सहअध्यक्षपदी नियुक्ती झालेबद्दल त्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे,माजी अध्यक्ष शिवाजीराव पुजारी,अॅड.दत्तात्रय तोडकरी,अध्यक्ष मोहन माळी,न.पा.पक्षनेते अजित जगताप,सामाजिक कार्यकर्ते अॅड.दत्तात्रय खडतरे आदी उपस्थित होते.
यावेळी पाटील म्हणाले,प्रत्येक विदयार्थी स्वतंत्र तेजबुध्दी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजून घेतला पाहिजे. विदयार्थ्यांमधील प्रकट अवगूण आणि सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार दयायचा असतो. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विदयार्थी हे दोन महत्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकावर सतत परिणाम होत असतो.सध्याच्या माहितीच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी फार मोठी आहे. विदयार्थी व पालक आणि शिक्षक यांनी एकत्र येवून विचार करण्याची वेळ आता आली आहे.कारण उदयाचा समाज हा सतत शिकत राहणार आहे.
यासाठी शिक्षकांची कार्यतत्परता खूप महत्वाची आहे. शिक्षकांच्या छोटया,मोठया कृतीतून हे संस्कार जोपासण्यासाठी शिक्षकांनी तत्पर असायला पाहिजे. यामुळे मुलांचे दडपण कमी होते व आनंददायी शिक्षण होते.तसेच वर्गातील वातावरण प्रेरक होते. शिक्षकांची व्यक्तीमत्व जेवढे प्रभावी,परिणामकारक व ज्ञानसमृध्द असेल तेवढे ते विदयार्थ्यांसाठी उपयुक्त असते.
आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी विदयार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांनी आपले ध्येय समजले पाहिजे असे त्यांनी सांगितले.सदर प्रसंगी प्रा.शिवाजीराव पुजारी,अजित जगताप,अॅड. दत्तात्रय खडतरे आदीनीही आपले विचार व्यक्त केले.
मंगळवेढा तालुका पत्रकार संघास 30 खुर्च्या भेट दिल्याबद्दल अजित जगताप यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.तसेच अॅड. दत्तात्रय खडतरे यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचा प्रसाद उपस्थितांना दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन अॅड.दत्तात्रय तोडकरी यांनी केले. तर तानाजी चौगुले यांनी आभार मानले.
यावेळी माजी अध्यक्ष बाळासाहेब नागणे,बाबासाहेब सासणे,शिवाजी केंगार,पत्रकार समाधान फुगारे, केशव जाधव,म्हाळाप्पा शिंदे, विलास काळे,रामा सप्ताळे, दत्तात्रय कांबळे,दादा लवटे,महेश वठारे,लखन कोंडुभैरी,प्रतिक भगरे,वासूदेव जोशी,रोहिदास भोरकडे आदी उपस्थित होते.
The teacher should be the one who makes himself happen and makes the students: Dattatraya Patil
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज