mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मंगळवेढ्यातील 4 जण संपर्कात आल्याने खळबळ,संशयित जिल्हा रुग्णालयात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मंगळवेढ्यातील 4 जण संपर्कात आल्याने खळबळ,संशयित जिल्हा रुग्णालयात


मंगळवेढा टाईम्स ऑनलाइन । मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावातील चार जण ग्वाल्हेर येथील कोरोनाग्रस्त असलेल्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्यांना तपासणीसाठी सोलापूर येथे पाठवण्यात आल्याची माहिती बोराळे आरोग्य केंद्राचे डॉ.वर्षा पवार यांनी दिली आहे.

सोलापुरातून ग्वाल्हेरला प्रवास करणारा द्राक्ष नेटिंग मजूर कोरोना पॉजिटीव्ह आला असून सोलापुरातील मंद्रुप तालुक्यातील एका गावात द्राक्ष नेटिंगसाठी हा मजूर आला होता.त्यातच बोराळे गावातील 4 जणांच्या संपर्कात आला आहे.मात्र तो व्यक्ती सध्या सोलापूर जिल्ह्यात नाही तसेच जिल्ह्यात एकही रुग्ण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली होती.

त्या गावात संपर्कात आलेल्या सर्व ग्रामस्थांची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू आहे. एक एप्रिल रोजी सोलापुरातुन हा मजूर ग्वाल्हेरला गेला होता. गावी परतल्यावर तपासणीकेल्यानंतर कोरोना पोजिटीव्ह असल्याचा अहवाल आला आहे. विशेष म्हणजे या रुग्णात कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत.

सोलापूर जिल्ह्यात करोना विषाणूची बाधा झालेला एकही रुग्ण आतापर्यंत आढळून आला नाही. परंतु दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगावात द्राक्षबागेत काम करून गावी परतलेल्या एका परप्रांतीय मजुराला करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली असून त्यामुळे प्रशासन चांगलेच कामाला लागले आहे.

सोलापूर जिल्ह्यात बहुतांश द्राक्षबागांमध्ये उत्तर प्रदेश व मध्यप्रदेशातील मजूर काम करतात. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये परप्रांतीय मजुरांचा वावर द्राक्षबागांमध्ये असताना राज्यात करोना संसर्ग प्रादुर्भाव सुरू होऊ न टाळेबंदी लागू होत असताना हे बहुधा परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळगावी परतले आहेत.

यापैकीच ग्वाल्हेरमध्ये पोहोचलेल्या एका मजुराला करोनाची बाधा झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या हाती आली. हा मजूर येळेगावातील एका द्राक्षमळ्यात काम करीत होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा येळेगावात धावून गेली आहे. संबंधित करोनाबाधित मजुराच्या संपर्कात येळागावातील कोणकोणत्या व्यक्ती आल्या, त्याची माहिती घेऊन संबंधित सर्व व्यक्तींना वैद्य्कीय तपासणीसाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत आहे.

————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 हजार 865 वर,24 तासांत 591 नवीन पॉझिटिव्ह केसेस

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 हजार 865 वर,24 तासांत 591 नवीन पॉझिटिव्ह केसेस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा ३१५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मोठा दिलासा; दिला अत्यंत महत्वाचा निर्णय

April 21, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

रक्त नात्यातील जमीन वाटणी पूर्णपणे मोफत; सातबारावरील हक्कासाठी शुल्क भरावे लागणार नाही; नेमका बदल असा, आधी काय आणि आता काय?

April 21, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

लेकींच्या शिक्षणाची चिंता मिटली! राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ‘हे’ शुल्कही होणार १०० टक्के माफ

April 21, 2026
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर दिले हाकलून; ‘या’ कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

April 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणारे डॉक्टर एसीबीच्या कचाट्यात; मंगळवेढ्यात खळबळ

April 20, 2026
मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

महिलांनो सावधान! ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार उघड

April 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा