मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्य सरकारने ग्रामीण व शहरी महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना सुरू केली आहे. या योजनेत महिलांना घरबसल्या पीठ गिरणी चालवण्याची संधी मिळणार आहे. सरकारकडून ही गिरणी १०० टक्के अनुदानावर दिली जाणार आहे, त्यामुळे महिलांना स्वतः पैसे लावावे लागणार नाहीत. या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळेल, उत्पन्न वाढेल आणि घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल.
योजनेचा उद्देश
ही योजना महिलांना घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देते. यामुळे त्यांना घरच्या घरी उत्पन्न मिळेल आणि आर्थिक आधार मिळणार आहे.
योजनेचे फायदे
१०० टक्के अनुदानावर पीठ गिरणी मिळेल.
घरच्या घरी गहू दळून व्यवसाय सुरू करता येईल.
महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल.
गरीब महिलांना जास्त प्राधान्य दिले जाईल.
घरच्या घरी रोजगार निर्मिती तयार होणार आहे.
आर्थिक स्थितीत सुधारणा तसेच महिलांना स्वतःच्या उत्पन्नाचे साधन मिळेल.
योजनेच्या अटी
महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
त्यांचे वय १८ ते ६० वर्षांदरम्यान असावे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजारांपेक्षा जास्त नसावे.
घरातील कोणीही आयकरदाते नसावेत.
ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे.
महिला बँक खातं आधारशी लिंक केलेले असावे.
सदर योजनेमधील लाभार्थी निवडीचा अधिकार समाज कल्याण विषय समितीकडे राहील.
अर्ज पंचायत समितीकडे सादर करण्यापूर्वी मागील ३ वर्षांत लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री करावी.
आवश्यक कागदपत्रे
राहण्याचा पुरावा (निवास प्रमाणपत्र)
उत्पन्नाचा दाखला
राशन कार्ड
बँक खात्याचा तपशील
आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
पासपोर्ट साइज फोटो
लाईट बिलची झेरॉक्स
अर्ज प्रक्रिया
या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद येथे जाऊन भेट देऊ शकता. यासाठी तुम्ही जवळच्या CSC केंद्रात जाऊन योजनेसाठी अर्ज भरू शकता.
१. या योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो?
महाराष्ट्रातील १८ ते ६० वर्ष वयोगटातील महिला, ज्यांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांच्या आत असावे.
२. पीठ गिरणी मोफत का मिळते?
सरकार १०० टक्के अनुदान देत आहे, महिलांना स्वतः पैसे मोजावे लागणार नाहीत.
३. अर्ज कुठे करावा?
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा CSC केंद्राद्वारे अर्ज करता येईल.
४. लाभार्थी निवडीसाठी काय अटी आहेत?
मागील ३ वर्षांत योजनेचा लाभ घेतलेला नसावा, आधारशी लिंक केलेले बँक खाते आवश्यक आहे.
५. योजनेमुळे महिलांना काय फायदे होणार?
घरबसल्या उत्पन्न वाढेल, आर्थिक स्वावलंबन मिळेल, रोजगार निर्मिती होईल, व वीज खर्च कमी होईल (सोलर चक्की).
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज