mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाची बातमी! जमिनींचे तुकडे प्रतिबंध अधिनियमात सुधारणांसाठी समिती स्थापन, GR जारी; ‘इतक्या’ दिवसात अहवाल येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 17, 2025
in राज्य
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

राज्य सरकारने ‘महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947’ मध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, अधिनियमातील तरतुदींविरुद्ध झालेल्या जमिनींच्या तुकड्यांचे नियमितीकरण करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यावर ही समिती लक्ष केंद्रित करणार आहे. महसूल व वन विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे.

शेत जमिनींचे लहान तुकडे होण्यापासून रोखण्यासाठी आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 1947 चा अधिनियम लागू करण्यात आला होता.

मात्र, अनेक वर्षांपासून या अधिनियमामुळे उद्भवणाऱ्या अडचणी आणि जमिनींच्या अनधिकृत तुकड्यांच्या नियमितीकरणाची मागणी जोर धरत होती. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत यासंबंधीची लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती.

त्यावेळी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून 15 दिवसांत याबाबत (एसओपी) मानक कार्यप्रणाली तयार करण्याचे आश्वासन दिले होते.

समितीची रचना आणि कार्यकक्षा

अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अपर मुख्य सचिव (नगरविकास-1), प्रधान सचिव (ग्रामविकास), जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, संचालक (नगर रचना), सह/उप सचिव (विधि व न्याय विभाग) यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण येथील सदस्य (प्रशासकीय) राजेंद्र क्षीरसागर आणि सेवानिवृत्त संचालक (नगर रचना) एन. आर. शेंडे हे निमंत्रित सदस्य म्हणून मार्गदर्शन करतील.

या समितीची प्रमुख कार्यकक्षापुढीलप्रमाणे आहे

• नागरी क्षेत्र वगळल्यामुळेहोणाऱ्या जमिनीच्या हस्तांतरणामुळे त्या भागातील विकासाचे नियोजनबद्ध हस्तांतरण व विकासाची कार्यपद्धती ठरवणे.

• अधिनियमाच्या कलम 8 ब मधील तरतुदींच्या अनुषंगाने नियमितीकरणाची प्रक्रिया कशी सुलभ करता येईल आणि नियमितीकरणाचीव्यवहार्यता तपासणे.

• कलम 9 (3) नुसार तुकड्यांच्या नियमितीकरणाचीकार्यपद्धती निश्चित करणे.

• नोंदणीकृतदस्ताने झालेल्या तुकड्यांचे नियमितीकरण आणि त्यांच्या हस्तांतरणाची अधिकार अभिलेखात नोंद घेण्यासाठी मानक कार्यप्रणाली ठरवणे.

• अनोंदणीकृत खरेदी व्यवहारांमध्ये खरेदीदारांचे नाव अधिकार अभिलेखात घेण्यासाठी कायद्यात सुधारणा आवश्यक असल्यास त्या सुचवणे.

• नोंदणीकृत खरेदी व्यवहारांचे नियमितीकरण मोहिम स्वरूपात घेणे.

• अनोंदणीकृत खरेदी व्यवहारामुळे झालेल्या तुकड्यांचे नियमितीकरण आणि त्यानंतरच्या नोंदणी प्रक्रियेची कार्यपद्धती ठरवणे.

समिती 15 दिवसात अहवाल देणार

समितीला 15 दिवसांत शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील जमिनींचे तुकडे पाडण्यासंबंधीच्या अनेक वर्षांच्या जटिल प्रश्नावर तोडगा निघणार आहे.

जमिनीच्या नोंदी अधिक स्पष्ट होतील आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. अधिवेशन संपण्यापूर्वी अध्यादेश निघेल असे सांगितले होते, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: तुकडा बंदी कायदा रद्द

संबंधित बातम्या

सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशनच्या बदल्यात मिळणार पैसे, ही एक अट असणार; नेमका काय होणार फायदा, कसा राबवला जाणार?

September 9, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

सर्वात मोठा पुरावा! मराठा आरक्षणाची लढाई आणखी मजबूत; मराठा-कुणबी एकच असल्याचा महत्वाचा पुरावा सापडला; कुणबी अन् मराठ्यांची ‘अशी’ नोंद

September 9, 2025
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

अभिमानास्पद कामगिरी! सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट

September 7, 2025
आज दिसणार वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण, चुकून सुद्धा ‘हे’ काम करु नका

कामाची बातमी! चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे? आज किती वाजता लागणार चंद्र ग्रहण; जाणून घ्या सुतक काळ

September 7, 2025
‘फार्मर मॉल’ची रील बनवा अन् मिळवा लाखोंची बक्षीस; ‘फार्मर मॉल’ कडून स्पर्धेची घोषणा; प्रत्येकाला कॉलेज बॅग, छत्री मोफत; विजेत्यांना आ.आवताडेंच्या हस्ते मिळणार बक्षीस; 9970304605 नंबरवर पाठवा रील

‘फार्मर मॉल’ची रील बनवा अन् मिळवा लाखोंची बक्षीस; ‘फार्मर मॉल’ कडून स्पर्धेची घोषणा; प्रत्येकाला कॉलेज बॅग, छत्री मोफत; विजेत्यांना आ.आवताडेंच्या हस्ते मिळणार बक्षीस; 9970304605 नंबरवर पाठवा रील

September 8, 2025
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच खोकला आला अन् तरुण जिवंत झाला; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक घटना; नेमकं प्रकरण काय?

September 8, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा आरक्षणाची प्रत्येक तालुक्यात किमान ‘इतके’ हजार प्रमाणपत्र वाटप करा; महसूल विभागाच्या पुणे आयुक्तांचा आदेश; सेवा पंधरवडा राबवला जाणार

September 6, 2025
आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

खबरदार! जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल; मनोज जरांगे पाटलांचे सरकारला इशारा

September 5, 2025
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

पोलिस कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत परीक्षेद्वारे अधिकारी होण्याची संधी; तीन वर्षांनंतर बंदीचा निर्णय मागे घेतला; कोण देऊ शकेल परीक्षा, काय आहे पात्रता?

September 3, 2025
Next Post
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

आगळावेगळा आदर्श! नोकरदार भावाने दिली सर्व जमीन शेतीत राबणाऱ्या भावाला; या निर्णयाने उपस्थितांची डोळे पाणावले

ताज्या बातम्या

सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशनच्या बदल्यात मिळणार पैसे, ही एक अट असणार; नेमका काय होणार फायदा, कसा राबवला जाणार?

September 9, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मुलांना सरकारी शाळेत शिकवल्यास करामध्ये मिळणार ५०% सूट; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

September 9, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

सर्वात मोठा पुरावा! मराठा आरक्षणाची लढाई आणखी मजबूत; मराठा-कुणबी एकच असल्याचा महत्वाचा पुरावा सापडला; कुणबी अन् मराठ्यांची ‘अशी’ नोंद

September 9, 2025
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

चोरटे शिरजोर! पाणी पिण्याचा बहाणा करुन एका वृध्द महिलेचे ८० हजाराचे दागिने लुटले; मंगळवेढा तालुक्यातील खळबळजनक घटना

September 8, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात मोबाईल नंबर टाकून उद्या स्वतः उपस्थित रहावे; आ.आवताडे यांनी केले आढावा बैठकीचे आयोजन

September 7, 2025
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

अभिमानास्पद कामगिरी! सैन्यात जवान असलेल्या पतीचा ह्रदयविकाराने मृत्यू; आता पत्नी झाली लेफ्टनंट

September 7, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा