mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

समझोता! रस्त्यासाठी पाच वर्षापासून तोंडही पाहत नव्हते; ‘जनसंवाद’मध्ये तहसीलदारांनी ‘या’ दोन भावांमध्ये संवाद घडवून वैर मिटवलं

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 11, 2023
in मंगळवेढा
जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देणार; मंगळवेढयाचे नवनियुक्त तहसीलदार मदन जाधव यांनी स्विकारला कार्यभार; त्यांच्यापुढे असणार  ‘हे’ आव्हाने

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडीचे दोन सख्खे भाऊ… पाच वर्षांपासून एकमेकांच्या घरी जाणे दूरच पण एकमेकांचे तोंडही पाहणे नाही… दोन्ही घरात अबोल, ताणतणाव आणि भांडणे रोजचीच… या सर्वांचे निमित्त एका भावाने दुसऱ्या भावाचा अडवलेला रस्ता..!

गावच्या हद्दीमध्ये जमीन असणाऱ्या रामेश्वर मारुती पडवळे व सिद्धेश्वर मारुती पडवळे यांनी तहसील कार्यालय मंगळवेढा यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या महसूल सप्ताह अंतर्गत ‘जनसंवाद’ या उपक्रमामध्ये रस्त्याचा विषय आपसी सामंजस्याने सोडविण्याबाबत तहसीलदार मदन जाधव यांनी आवाहन केले.

या आवाहनाला प्रतिसाद देत या दोन्ही भावांनी गेल्या पाच वर्षांपासून चाललेला रस्त्याचा वाद आपसी सामंजस्याने मिटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर तहसीलदारांनी त्यांच्यातील वाद मिटवला आहे.

यातील रामेश्वर मारुती पडवळे यांचे कचरेवाडी हद्दीतील गट क्रमांक १६३/२/ब व सिद्धेश्वर मारुती पडवळे यांचे गट क्रमांक १६३/२/क येथे प्रत्येकी १ हेक्टर ३२ गुंठे क्षेत्र आहे.

तसेच पाच वर्षांपासून येथील रस्त्याबाबत दोन्ही भावांचा वाद सुरू होता. या वादाचे पर्यावसन कुटुंबात होऊन दोन्ही कुटुंबातील सदस्यांची मने दुभंगली होती. रस्त्यावरून होणाऱ्या वादाचा परिणाम वारंवार घरगुती भांडणात होत होता.

या रस्त्याबाबत तहसील कार्यालयात अर्धन्यायिक प्रकरण सुरू होते. दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडण्यासाठी वकिलांची नेमणूक केली होती. परंतु महसूल सप्ताहनिमित्त ‘जनसंवाद’मध्ये केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही भावांनी समझोत्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला दोन्ही वकिलांनीही आनंदाने होकार दिला.

त्यानंतर तहसील कार्यालयात दोन्ही भाऊ आणि दोन्ही बाजूचे वकील यांनी उपस्थित राहून आपसी लेखी तडजोडनामा तयार करून सादर केला. यावेळी तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते दोन्ही भाऊ व दोन्ही वकील यांना वृक्षाचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पाच वर्षांपासून चाललेल्या रस्त्याचा वाद आपसात मिटवल्याने दोन्ही भावांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

दोन्ही भावांच्या चेहऱ्यावर केवळ रस्त्याचाच नाही तर कुटुंबातील सुद्धा वाद मिटून दोन्ही कुटुंबातील मने जुळल्याचा भाव स्पष्ट दिसत होता. या प्रकरणामध्ये वकील मनीष मर्दा आणि अनिल दुधाळ यांनी मोलाची भूमिका बजावली.

रस्त्याचे वाद आपसात मिटल्यास शेतकऱ्यांची वेळेची व आर्थिक बचत होणार

तालुक्यातील इतरही ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याचे वाद आपसात मिटल्यास शेतकऱ्यांची वेळेची व आर्थिक बचत होणार असून, मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. शिवाय गावातील वातावरणही आनंदी राहायला मदत होणार आहे. तक्रारदार व सामनेवाला शेतकऱ्यांनी महसूलच्या जनसंवाद उपक्रमात सहभागी होऊन आपली प्रकरणे निकाली काढून तडजोड केल्यास अनेक भांडणे संपतील. – मदन जाधव, तहसीलदार, मंगळवेढा.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: तहसीलदार मदन जाधव

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मंगळवेढेकरांनो! गॅसची ‘ई-केवायसी’ त्वरित करा, अन्यथा सबसिडी होईल बंद; ​शांतीसागर इंडेन गॅस कंपनीने नागरिकांना केले आवाहन

February 25, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

February 22, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

​सहकार आणि समाजकारणाचा सुवर्णसंगम म्हणजे स्व.सुभाष शहा; आमदार समाधान आवताडे यांनी जागवल्या आठवणी

February 19, 2026
Next Post
विकृती! तीन महिलांच्या खुनामागे शेती व पूर्व वैमनस्याचे प्राथमिक तपासात कबुली

धक्कादायक! पत्नी सोडचिठ्ठी देत नसल्याच्या रागातून मामाचा खून; सोलापूर जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा