मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये व योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून, याबाबतचा शासन निर्णय १५ जून रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
या योजनेच्या सर्वाधिक अंमलबजावणीची जबाबदारी कृषी विभागाकडे सोपविण्यात आली आहे. या शासन निर्णयामध्ये अर्जदार व संबंधित कृषि, महसूल व ग्रामविकास विभागाने पार पाडावयाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
तसेच पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करणे व पात्र लाभार्थीना मान्यता प्रदान करण्याबाबतची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आली आहे.
योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय संनियंत्रण समित्या स्थापन करून या समित्यांचे कार्य व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कृषी विभागाकडे स्वयं नोंदणीकृत लाभार्थीना मान्यता प्रदान करावी.
तालुकास्तरावर लाभार्थीची पोर्टलवर नोंदणी करावी. अपात्र लाभार्थीना पडताळणीअंती पोर्टलवर चिन्हांकित करावे. डाटा दुरुस्ती करावी ( भूमी अभिलेखाशी संबंधीत माहिती वगळता, लाभार्थीची भौतिक तपासणी करावी,
चूकीने अपात्र केलेल्या लाभार्थीना पात्र करावे, मयत लाभार्थीची पोर्टलवर नोंद घ्यावी, तक्रार निवारण करावे, सामाजिक अंकेक्षण करावे, योजनेची प्रचार प्रसिद्धी करावी,
योजना अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक इतर कामकाज करावे.) या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज