mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आदर्श घ्या! पतीच्या निधनानंतरची पत्नीची विधवा प्रथा बंद; ‘या’ ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 9, 2022
in राज्य
आदर्श घ्या! पतीच्या निधनानंतरची पत्नीची विधवा प्रथा बंद; ‘या’ ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स ।

समाजामध्ये पतीच्या निधनानंतर अनेक बंधने लागु केली जातात. त्यामुळे विधवा महिलांचा मानसिक छळ झाल्यासारखा असतो. मात्र याच प्रथेला २१ व्या शतकामध्ये मोडून काढण्यात आले आहे.

पतीच्या निधनानंतर विधवा समजून तिची आभूषणे काढणे, कुंकू पुसणे यांसह अन्य प्रकारे छळ करण्याची प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे.

याबाबतचा ठराव हेरवाडच्या ग्रामसभेत संमत करण्यात आला आहे. विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचलेले पाऊल हे खरोखर कौतुकास्पद आहे.

हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात चांगली चर्चा आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीला दिशादर्शक असून हे चळवळीचे लोण महाराष्ट्रातचं नव्हे तर भारतात पसरणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हेरवाड गावात महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव संमत केला आहे.

खरंतर विधवा महिलांच्या प्रश्नावर पूर्वी पासून अनेकांनी खूपच चांगले काम केले आहे. फुले शाहू आंबेडकर यांच्या कामाला तोडच नाही. डॉ. नरेंद दाभोलकर व त्यांच्या टीममुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला.

विधवा महिलांच्या पुनर्विवाह, आरोग्य, आर्थिक, मुलांचे शिक्षण, अलीकडे कोरोनामुळे झालेल्या विधवा महिला यांचा प्रश्न दुर्लक्षित राहिला आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरचा कुंकू यांसह, मंगळसूत्र तोडणे.

बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे व काही ठिकाणी हे साहित्य पतीच्या अग्नीत टाकणे हा प्रकार तिच्या इच्छा विरोधी आहे. तसेच मरेपर्यंत तिला सर्व प्रकारच्या कार्यक्रमात सहभागी होता येत नाही.

सतीची प्रथा बंद झाली त्या पध्दतीने ही विधवा प्रथा बंद करण्यासाठी कायदा व्हायला पाहिजे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे.

या हजारो वर्षांपासून आलेल्या अनिष्ट प्रथेला कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी हा विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियान प्रेम बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून प्रकाश झिंजाडे हे काम करीत आहेत.

विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर

आज ही नवरा गेल्यावर कुंकू पुसणे,बांगड्या फोडणे,मंगळसूत्र काढणे या गोष्टी केल्या जातात..फक्त एक व्यक्ती गेली म्हणून स्त्रीला असं समाजात ‘ विधवा ‘ हा स्टॅम्प मारणे सार्वजनिकरीत्या चुकीचे आहे..कोल्हापुरातील हेरवाड ग्रामपंचायतीचे अभिनंदन! त्यांनी ह्या प्रथा थांबवण्याचा निर्णय घेतला pic.twitter.com/z5eqloqfN7

— Rashmi Puranik (@Marathi_Rash) May 8, 2022

हेरवाड गावात ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव मंजूर केला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीला दिशादर्शक असून हे चळवळीचे लोण महाराष्ट्रातचं नव्हे तर भारतात पसरणार आहे.

लवकरच शिरोळ तालुक्यातील सर्व सरपंचांची या विषयावर कार्यशाळा आयोजित करून संपूर्ण शिरोळ तालुका विधवा प्रथामुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

इतर ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा

विधवा महिलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे हक्क त्यांना देण्यासाठी ही प्रथा बंद करण्याची गरज आहे.

या अभियानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव संमत करण्यात आला असून शिरोळ तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनी सदर ठराव संमत करून शासनाकडे पाठवावा असे आवाहन हेरवाड गावचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विधवा प्रथा बंदी

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 11, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 11, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 11, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण; कमवा आणि शिका योजनेतून ‘एवढे’ रुपये मिळणार; सरकारची घोषण

March 10, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार नको, १ लाखाचा लाभ द्या; ​उपसरपंच बालाजी गरड यांची शासनाकडे आग्रही मागणी ​

March 7, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर; ‘इतक्या’ लाखांपर्यंत कर्जमाफी; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

March 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 6, 2026
Next Post
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मुलाच्या किडनीवर उपचारासाठी पैसे नसल्याने आईची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा