टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्राच्या इतिहासातील कुस्ती हा खेळ एक सोनेरी पान आहे. कुस्तीच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचा इतिहासच पूर्ण होणार नाही. पण कुस्ती या मर्दानी खेळाकडे आधुनिक महाराष्ट्रातील युवक पाठ फिरवताना सध्या दिसत आहे.
ग्रामीण भागातील जत्रांमध्ये मात्र कुस्त्यांचे फड मोठ्या प्रमाणावर रंगताना आजही दिसत आहेत. त्यामुळे कुस्तीला खरी संजीवनी सध्या ग्रामीण भागातील जत्रांमुळेच मिळत आहे असे प्रतिपादन भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी केले.
रड्डे तालुका मंगळवेढा येथे ग्रामदैवत देवी लक्ष्मी आईच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्तीच्या फडाचे उद्घाटन करताना अनिल सावंत बोलत होते.
यावेळी सरपंच संजय कोळेकर, भैरवनाथ शुगरचे कृष्णदेव लोंढे, माजी सरपंच सुरेश कांबळे, माजी सभापती दत्तात्रय कांबळे, दामाजी शुगरचे माजी संचालक संभाजी लवटे, नवनाथ महाराज मठाचे मठाधिपती बंडोपंत महाराज,
किरण सांगोलकर, नामदेव कोकरे, लक्ष्मीदेवी महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरज थोरबोले, अक्षय सपताळे, पोपट कांबळे, सुनिल थोरबोले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोरख सांगोलकर,
सतिश काकडे, सुनिल थोरबोले, प्राथमिक पदवीधर शिक्षक संघटनेचे दत्तात्रय येडवे, कुस्ती निवेदक प्रशांत चव्हाण, दिपक कांबळे हे उपस्थित होते.
अनिल सावंत पुढे बोलताना म्हणाले की, तळगाळातील मुलांना खेळाच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या तर काय होवू शकते याचा प्रत्यय आपण कॉमनवेल्थमध्ये पाहिला. भारतात नेहमीच आधुनिक खेळाला जास्त महत्व दिल्याने पारंपारीक खेळांना याचा फटका बसल्याचे चित्र पहावयास मिळते.
ग्रामीण भागातील रांगडी मुले कुस्तीच्या आखाड्यात घाम गाळून सराव करतात परंतू त्यांना पुरेशा सोयीसुवीधा, संधी मिळत नसल्याने मातीचा खेळ हा मातीतच राहतोय. याकडे शासनाने लक्ष देऊन याला दर्जेदारपणे इतर खेळांबरोबर स्थान देवून ग्रामिण भागातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याचे गरज आहे.
आज हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कुस्तीचे आखाडे शिल्लक राहिले आहेत. आखाड्यात तयार होणाऱ्या भविष्यातील कुस्तीपट्टूंना योग्य प्रशिक्षणासाठी कोणत्याच उपाययोजना दिसत नाहीत.
ऑलंपिक स्पर्धेत भारतातील पदक मिळवून देणारे खशाबा जाधव हे याच मातीतले. याचा आदर्श ठेवून अनेक होतकरू तरूण योग्य संधीची वाट पाहत आहेत. पण या संधी उपलब्ध करण्याकरीता ग्रामिण भागात नव्याने कुस्त्यांचे आखाडे रंगले पाहिजेत.
केवळ जत्रा-यात्रांच्या माध्यमातून कुस्तींगीरांचे भवितव्य ठरवून काहीच होणार नाही. यासाठी योग्य ती पाउले उचलून या मातीतील क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्याबरोबर याच्या पुर्नबांधणीला सुरवात करणे गरजेचे आहे असेही बोलताना यावेळी सावंत म्हणाले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज