mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 28, 2026
in राज्य
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मंगळवेढा टाईम्स न्युज ।

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल अखेर समोर आला आहे. डीजीसीएने आपल्या वेबसाईटवर अहवाल प्रसिद्ध केला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना झालाय पूर्ण झाला आहे.

अजितदादांच्या विमानाचा 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. विमान कोसळताना आधी झाडावर धडकल्याची धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे.

काल प्रसिद्ध केलेल्या अहवालात ब्लॅक बॉक्स आणि कॉकपीट संदर्भात कुठलीही माहिती नाही. या अहवालात केवळ प्राथमिक माहिती आहे. मात्र अंतिम अहवाल यायला वेळ लागणार आहे.

अपघातावेळी २ हजार मीटर इतरी दृष्यमानता होती. तर फ्लाईट डाटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याचे अहवालात म्हटले आहे. ब्लॅक बॉक्स, कॉकपीट तपासण्यासाठी अमेरिकेन कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे.

कॉकपीट हाताळण्यासाठी अमेरिकेतून टीम भारतात येणार आहे. अपघातामुळे विमानांमध्ये असणारा कॉकपीट आणि FDR डॅमेज झाला होता. त्यातील डाटा सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेतून टीम भारतात येणार आहे . ज्या कंपनीने हा ब्लॅक बॉक्स बनवला आहे त्या अमेरिकन कंपनीची मदत घेतली जाणार आहे. हा रिपोर्ट अपघाताच्या कारणांची प्राथमिक माहिती देणारा आहे.

नेमकं काय म्हटले आहे अहवालात?

अजित दादांच्या विमान अपघाताबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर करण्यात आला असून या अहवालात अपघाताच्या कारणांबाबत महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. एकूण 22 पानांचा हा अहवाल संबंधित तपास यंत्रणेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

अहवालानुसार, विमानाने प्रथम एका झाडाला धडक दिली आणि त्यानंतर ते जमीनीवर खाली कोसळले. अपघाताच्या वेळी परिसरातील दृश्यमानता सुमारे २ हजार मीटर इतकी होती, असे नमूद करण्यात आले आहे. विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) उष्णतेमुळे खराब झाल्याचे प्राथमिक निष्कर्षात स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र उपलब्ध यंत्रणांमधून रॉ डेटा डाऊनलोड करण्यात आला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. त्यामुळे काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.सदर अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून अंतिम निष्कर्षांसाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर 30 दिवसात काय 30 बदल झाले?

विमान अपघात: 28 जानेवारी रोजी सकाळी 8:46 वाजता बारामती विमानतळावर लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नादरम्यान दाट धुक्यामुळे लिअरजेट 45 एक्सआर (VT-SSK) कोसळले.

राज्यात दुखवटा जाहीर: महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. सर्व सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आणि शासकीय कार्यक्रम रद्द झाले.

अंतिम संस्कार: 29 जानेवारी रोजी बारामतीमध्ये अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्याला गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

उत्तराधिकारी चर्चा: अंत्यसंस्कारानंतर 24 तासांच्या आत राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली.

सुनेत्रा पवारांचा शपथविधी: 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, राज्याच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या.

खातेवाटप: सुनेत्रा पवार यांना त्या अल्पसंख्याक विकास, राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा व युवक कल्याण या मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली.

अर्थ खाते बदल: एक दशकाहून अधिक काळ अजित पवार यांच्याकडे असलेले महत्त्वाचे अर्थ आणि नियोजन खाते मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःकडे घेतले.

राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेते: 40 हून अधिक आमदारांची एकजूट राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

सुनेत्रा पर्व – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने सर्वानुमते सुनेत्रा अजित पवार यांच्या नावावर मोहर उमटवली आहे. या निवडीमुळे पक्षाच्या नेतृत्वात नवे समीकरण निर्माण झाले असून संघटनात्मक पुनर्बांधणीला वेग मिळणार असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता सुनेत्रा पवार पर्व सुरू झालंय.

पार्थ पवार राज्यसभेवर: सुनेत्रा पवार यांच्यानंतर रिक्त केलेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पक्षाने पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली.

DGCA कडून विशेष ऑडिट: 2 फेब्रुवारी रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या कंपनीच्या विशेष सुरक्षा ऑडिटचे आदेश दिले.

सीआयडी तपास: सीआयडी तपासामध्ये घातपात, गुन्हेगारी कट किंवा गुन्हेगारी निष्काळजीपणा, बेपर्वाईचे कृत्य, किंवा कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य घडले आहे का, या दिशेने तपास सुरू आहे.

ब्लॅक बॉक्स जप्त: अपघाताच्या शेवटच्या क्षणांची माहिती मिळवण्यासाठी फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले.

जय पवारांची सोशल मीडिया पोस्ट : विमान अपघातात ‘ब्लॅक बॉक्स’ इतक्या सहजपणे नष्ट होऊ शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेचे पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. जय पवारांच्या पोस्टमुळे हा अपघात तांत्रिक त्रुटीमुळे झाला की हा घातपात आहे, या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

सीबीआय तपासाची विनंती: पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला अधिकृत पत्र लिहून सीबीआय तपासाची विनंती केली.

रोहित पवार यांची तक्रार: आमदार रोहित पवार यांनी मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास विलंब केल्याचा आरोप केला, त्यानंतर त्यांची तक्रार सीआयडीकडे वर्ग करण्यात आली.

हवाई सुरक्षा ऑडिट: महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या सर्व खाजगी चार्टर कंपन्यांचे अनिवार्य सुरक्षा ऑडिट सुरू करण्यात आले.

अल्पसंख्याक दर्जा वाद: अपघाताच्या दिवशी 75 शिक्षण संस्थांना तातडीने अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला.

फडणवीसांकडून स्थगिती: मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या 75 संस्थांच्या निर्णयांना स्थगिती दिली आणि अल्पसंख्याक विकास विभागाच्या चौकशीचे आदेश दिले.

अधिकाऱ्यावर कारवाई: अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर रखडलेल्या फाईलींवर लगोलग स्वाक्षऱ्यांचा धडाका लावल्याच्या प्रकरणात ज्येष्ठ सनदी अधिकारी मिलिंद शेनॉय यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

अधिकृत स्पष्टीकरण: 23 फेब्रुवारी रोजी विभागाने स्पष्ट केले की अपघाताच्या दिवशी (28 जानेवारी) कोणत्याही फाईलींवर स्वाक्षरी करण्यात आली नव्हती.

विरोधकांचा बहिष्कार: 22 फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अपघाताच्या तपासात होणाऱ्या दिरंगाईचा निषेध करत मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला.

विमानांनर बंदी: व्हीएसआर या विमान वाहतूक कंपनीच्या उड्डाणांवर बंदी घालण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. अपघातानंतर कंपनीच्या विमानाचे विशेष ऑडिट करण्यात आले होते. ऑडिटमध्ये उणिवा आढळल्याने विमानंच्या उड्डणास मनाई करण्यात आली आहे.

सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष: २६ फेब्रुवारी रोजी वरळी येथील अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

सुनेत्रा पवारांचे पहिले भावनिक भाषण: अध्यक्षपदी निवड झाल्यावर सुनेत्रा पवार यांनी ‘दादांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची’ शपथ घेत पहिले जाहीर भाषण केले.

प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष: प्रफुल्ल पटेल यांची पुन्हा एकदा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

न लाभलेला बेस्ट मुख्यमंत्री : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. ‘अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड’ असे म्हणत देवेंद्र फडणवीस हळहळले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नेते शोकाकूल: राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. मुंबईतील विधानभवनात हे अधिवेशन पार पडत आहे. मात्र या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनातील वातावरण भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्याप्रमाणे अजित पवार यांना श्रद्धांजली देखील वाहिली. यावेळी सर्वच नेते खूप भावूक झालेले दिसून आले.

बारामती स्मारक योजना: अजित पवार यांच्या 35 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचा सन्मान करण्यासाठी बारामतीमध्ये कायमस्वरूपी स्मारक आणि पुतळा उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली.

अजित पवारांच्या निधनाचा काल पहिला प्राथमिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित पवार अपघात

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

खुर्ची तीच, फक्त नाव बदलले! ग्रामंपचायतींवर सरपंचांना प्रशासक बनवून सरकारने साधली ‘राजकीय सोय’

February 22, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात; आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र

February 21, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026

ताज्या बातम्या

मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

February 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा