टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील भीमा नदी पात्रातून यारीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा करुन त्याच्या साठ्यावर पोलीसांनी छापा टाकून
जवळपास वाळूच्या वाहनासह 5 लाख 77 हजार रुपये किंमतीचा माल जप्त करुन ट्रॅक्टर चालक सचिन उमाजी जाधव (रा.घुमेरावाडा वेळापूर) आण्णा भिवा कोकरे (ब्रम्हपुरी), सुरेश चौगुले, विजय जावळे (मंगळवेढा), विजय माने (मळोली), विशाल जाधव (वेळापूर)
या सहा जणाविरुध्द वाळू चोरी व पर्यावरण संरक्षण अधिनियमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान मंगळवेढा पोलीसांनी वर्षभरात प्रथमच मोठी कारवाई केल्याने वाळू तस्कारामधून खळबळ उडाली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, ब्रम्हपुरी येथील भीमा नदी पात्रातील यारीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना मिळताच
बोराळे बीटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसो पिंगळे, पोलीस हवालदार महेश कोळी,तुकाराम कोळी यासह पोलीसांनी दि.15 रोजी सकाळी 10.30 वाजता चारचाकी वाहनाने ब्रम्हपुरी गाठून,
रोडला गाडी उभा करुन पाच कि.मी. काट्याकुट्यातून रस्ता पार करीत भीमा नदीचे पात्र गाठले. यावेळी वरील आरोपींनी पोलीसांना पाहताच मोटर सायकलवरुन तर काहींनी काट्याच्या चिल्लारातून पलायन केले.
यामध्ये ट्रॅक्टर चालक सचिन उमाजी जाधव याला पकडण्यात पोलीसांना यश आले. ब्रम्हपुरी हद्दीतील जमीन गट नं.822/01 येथे 1 लाख 2 हजार रुपये किंमतीचा 17 ब्रास वाळू साठा, 6 हजार रुपये प्रती ब्रास किंमती प्रमाणे,
एक स्वराज ट्रॅक्टर 3 लाख, वाळू उपसा करणार्या दोन यारी कप्पीसह 1 लाख 50 हजार, 25 हजार रुपये किंमतीची बजाज प्लाटीना मोटर सायकल असा एकूण 5 लाख 77 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
याची फिर्याद पोलीस नाईक ईश्वर दुधाळ यांनी दिली असून याचा अधिक तपास बोराळ बीटचे पोलीस हवालदार महेश कोळी हे करीत आहेत.
दरम्यान ही वाळूची कारवाई पोलीस प्रशासनाने केली आहे. सोलापूर जिल्ह्यात शासकीय वाळूचा ठेका कुठेही झाला नसताना भीमा नदी पात्रात गेल्या अनेक महिन्यापासून यारीच्या सहाय्याने बेकायदा वाळू उपसा करुन त्याची विक्री मंगळवेढा शहरासह अनेक गावातून होत असताना महसूल खाते मात्र अनभिज्ञ कसे काय राहिले? असा संतापजनक सवाल या कारवाईनंतर विचारला जात आहे.
या गावात महसूल विभागाचे तलाठी येथे कार्यरत असताना त्यांना याची कल्पना का नव्हती? ते वाळू तस्कारांना मुकपाठींबा तर देत नाहीत ना? असा संशय असल्याची नागरिकांमधून होत आहे.
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करुन दोषी कर्मचार्यावर कारवाईची मागणी होत आहे.
या विभागात मंडल अधिकारी व तलाठी कार्यरत असताना शासनाच्या मुद्देमालाची चोरी गेल्या अनेक महिन्यापासून नदी पात्रात पाणी असताना सुरु असल्याचा बोलबाला होत आहे.
महसूल यंत्रणे वाळूच्या कारवाईसाठी कुठलेही पथक सध्या नेमले नसल्यामुळे वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. बांधकामाच्या ठिकाणी वाळूचे भलेमोठे ढिगारे सुर्योदयापुर्वी येवून पडत असल्याचे चित्र आहे.
वाळू उपशावर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरित्या कारवाई केली तरच शासनाच्या मालमत्तेची चोरी थांबू शकते अन्यथा नदी पात्र भकास होण्यास वेळ लागणार नसल्याच्या सुज्ञ नागरिकांच्या प्रतिक्रीया आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज