टीम मंगळवेढा टाईम्स ।
एका तासापूर्वी जन्मलेले एक नवजात पुरुष जातीचे बाळ रस्त्याच्या मधोमध सोडून आई-वडिलांनी पलायन केले होते. ही घटना नारायण चिंचोली येथे रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे.
फुलचिंचोली (ता.पंढरपूर) येथील अविनाश नागनाथ वसेकर ( वय ३२ ) हे त्यांच्या कुटुंबासह रात्री साडेदहाच्या सुमारास मायाक्का चिंचणी देवदर्शनासाठी त्यांच्या चारचाकी गाडीने जात होते.
या दरम्यान ते नारायण चिंचोली गावातील पाण्याच्या टाकीच्या समोर साईराज ढाब्याजवळ आले असता त्यांना रस्त्याच्या मध्यभागी एक लहान बाळ पडल्याचे दिसून आले.
त्यांनी त्यांचे वाहन तत्काळ बाजुला घेऊन वाहनातून खाली उतरले. मोबाईलची टॉर्च लावून रोडच्या मधोमध पडलेल्या बाळाजवळ जाऊन पाहिले असता एक नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक अंदाजे १ ते २ तासापूर्वी जन्मलेले असल्याचे दिसून आले.
त्यांनी आजुबाजुला पाहिले. मात्र, त्या ठिकाणी त्यांना कोणीही दिसून आले नाही. त्यांनी त्या बाळास त्यांच्याकडे असलेल्या कापडामध्ये गुंडाळून बाजूस घेतले.
नारायण चिंचोली येथील त्यांचे ओळखीचे महेश गुंड यांना याबाबत माहिती देऊन त्यांना बोलावून घेतले त्यानंतर नारायण चिंचोली येथील महेश गुंड व त्यांच्या सोबत गावातील चार ते पाच लोक आले.
त्या सर्वांनी मिळून त्यांच्या वाहनातून संबंधीत नवजात बाळाला उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी हॉस्पिलटमध्ये दाखल केले आहे.
याबाबत अविनाश नागनाथ वसेकर यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. या बाळाच्या आई वडिलांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज