टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यात जून-जुलैदरम्यान कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते. त्यावेळी लसीकरण मोहिमेला दिलेली गती हा त्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वेत्तम उपाय ठरेल, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जालन्यात बोलताना व्यक्त केले.
राज्यात आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच कोरोनाविरोधी लढय़ातील इतर फ्रंटलाईन वर्कर्सना प्रिकॉशन डोस दिला जात आहे.
या प्रिकॉशन डोससाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
सर्व नागरिकांना बुस्टर डोस देणे गरजेचे नाही, असेही ते म्हणाले. यावेळी पत्रकारांनी त्यांना जालना जिह्यातील बेकायदा गर्भपात केंद्रांवरील कारवाईबद्दल विचारणा केली.
त्यावर अशा बेकायदा गर्भपात केंद्रांवर कठोर कारवाई करण्यासंबंधी आरोग्य विभागाला निर्देश दिले आहेत.
जिह्यातील सर्व बोगस डॉक्टरांवर विशेष मोहीम राबवून कडक कारवाई केली जाईल असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज