mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस, या प्रमुख मुद्द्यांवर गाजणार; कामकाज असे असणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 5, 2021
in राज्य
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्र सरकारचे पावसाळी अधिवेशन  आजपासून मुंबईत सकाळी 11 वाजता सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारवर टीका करतील तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेवर महाविकासआघाडी सरकारचे नेते वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतील.

अवघ्या दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक पवित्रा घेत सरकारची कोंडी करतील असं समजतं. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची शक्यता जवळपास कमी असल्याने लक्षवेधी तारांकित प्रश्न -उत्तरेदेखील नसणार आहेत. यामुळे विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतील.

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था, सध्याच्या कोरोना संकटात लोकांचे झालेले हाल मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले आहे अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्य सरकारची कोंडी विरोधक करतील.

तर दुसरीकडे ED च्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून तिसरे समन्स मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी देशमुख प्रयत्न करत आहेत. देशमुख यांच्या मुद्द्यावरूनदेखील विधिमंडळामध्ये पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

विधानसभेत आज कामकाज असे असणार

आज विधानसभा सत्रामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन 2021-22 च्या पुरवणी भागाच्या मागण्या सादर केल्या जाणार आहेत. तसेच वेगवेगळ्या विभागांची कागदपत्रं सभागृहाच्या पटलावर सादर केली जातील.

तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेच्या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या चौकशीच्या समितीला पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिनांकापर्यंत वेळ वाढवून देण्यात यावा, अशा स्वरूपाचा प्रस्तावदेखील आज मांडण्यात येणार आहे.

विधानसभेचे सदस्य राहिलेले रावसाहेब अंतापुरकर, राज्यसभेचे विद्यमान सदस्य आणि माजी विधानसभा सदस्य राजू सातव, माजी मंत्री संजय देवतळे, रामप्रसाद बोराडे, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या दुःखद निधनाबद्दलही सभागृहामध्ये शोकप्रस्ताव असेल.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज सकाळी दहाच्या आसपास विधिमंडळ काँग्रेस कार्यालयाची बैठक होणार असून या बैठकीकडे लक्ष लागलं आहे. काँग्रेस आता स्वतःच्या भूमिकेवरून मागे हटणार की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावणार याकडे लक्ष आहे. तूर्तास तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता जवळपास संपली आहे.

सरकारचा अधिवेशनातून पळ काढण्याचा डाव

राज्यात कोविडच्या नावाखाली सरकारकडून अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला आहे. अधिवेशनात संसदीय आयुधे वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. विधीमंडळात सदस्यांनी बोलू नये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सरकार राज्यातील प्रश्‍नांपासून पळ काढत आहे.

मात्र विधीमंडळात बोलू दिले जात नसेल तर माध्यमांसमोर बोलू आणि सरकारचा चेहरा उघडा पाडू अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पावसाळी अधिवेशनमहाराष्ट्र राज्य सरकार

संबंधित बातम्या

चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

March 2, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

खुर्ची तीच, फक्त नाव बदलले! ग्रामंपचायतींवर सरपंचांना प्रशासक बनवून सरकारने साधली ‘राजकीय सोय’

February 22, 2026
Next Post
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मंगळवेढ्यातील शिक्षकाच्या मुलाची आत्महत्या

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा