मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । हवामान विभाग आज सकाळी एक आंनद वार्ता घेऊन आला आहे. मॉन्सूनचे आगमन नेहमीप्रमाणे १ जून रोजी केरळ येथे होणार असल्याची हवामान विभागाने आज जाहीर केला आहे. मॉन्सूनचे गुरुवारी बंगालच्या उपसागरात आणखी काही भागात आगमन झाले आहे़. मालदिव, कोमोरिन क्षेत्रात आगमनाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असून येत्या ४८ तासात मॉन्सूनचे त्या भागात आगमन होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील पूर्व मध्य अरब समुद्राच्या भागात कमी दाबाचे येत्या ४८ तासात तयार होण्याची शक्यता आहे. ४ जूननंतर त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असून ते दक्षिण ओमान आणि पूर्व येमन देशाच्या दिशेने जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या काळात मच्छीमारांनी पश्चिम अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.
यापूर्वी हवामान विभागाने मॉन्सूनला येण्याचा उशीर होण्याची शक्यता असून तो ५ जूनला केरळला येण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यात त्यांनी मॉडेल एरर ४ दिवस कमी किंवा जास्त दाखविले होते. नव्या अंदाजानुसार केरळमध्ये १ जूनला मॉन्सून धडकण्याची शक्यता आहे.
The monsoon is expected to arrive on June 1, according to the meteorological department
—————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज