मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील आज सोमवारचा आठवडी बाजार शिवप्रेमी चौकातील नेहमीच्या ठिकाणी भरणार नसल्याची माहिती मंगळवेढा नगरपालिकेच्या प्रशासनाने दिले आहे.
याबाबत मंगळवेढा नगरपालिकेने जाहीर प्रसिद्धीकरण केले असून यामध्ये म्हटले आहे की, मंगळवेढा शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, भाजी व फळे विक्रेत्यांना कळविण्यात येते की, आज सोमवार दिनांक २६ जून २०२३ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता श्री संत गजानन महाराज शेगांव यांची पालखी मंगळवेढा शहरात मुक्कामी येणार आहे.
त्यामुळे दिनांक २६ जून २०२३ रोजीचा सोमवारचा आठवडा बाजार सर्वांच्या सोयीसाठी फक्त एक सोमवारचा आठवडा बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) येथे भरवण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
सदर दिवशी पालखी मार्गावरील मटन, चिकन व मासे इत्यादींची दुकाने बंद राहतील. पालखी मार्गावर कोठेही अडथळा होणार नाही याची नागरीकांनी दक्षता घ्यावी. सदर नियमांचे पालन करून नगरपरिषदेस सहकार्य करावे ही विनंती या प्रसिद्धीकरणात केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज