टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे भेट देत असून तेथील नागरिकांशी संवाद साधत आहेत. मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी, तांडोर, सिद्धापूर, अरली व बालाजीनगर येथील नागरिकांशी संवाद साधताना धोत्रे बोलत होते.
यापूर्वीचे आमदारांनी मंगळवेढा तालुक्यात पाणी आणतो म्हणून जनतेची दिशाभूल केली असून विकास कामांसाठी निधी आणला असे खोटे बोलत आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांना विजयी करण्याचा मतदार संघातील नागरिकांनी निर्धार केला आहे.
आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे दिलीप बापू धोत्रे यांनी मागील अनेक वर्षांपासून मतदार संघातील नागरिकांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे.
पंढरपुरातील नागरिकांचा वाढीव कर माफ करणे, हिंदू, मुस्लिम स्मशानभूमी दुरुस्ती , रस्ते खड्डे मुक्त करणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करणे, बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे,
महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग उभा करून देणे याचबरोबर कोरोना काळात त्यांनी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी पल्स कोविड हॉस्पिटलची निर्मिती, तसेच एकही नागरिक उपाशी झोपणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती.
त्यामुळे दिलीप बापू धोत्रे यांच्याकडे सर्वसामान्यांना मदत करणारे नेतृत्व म्हणून पाहिले जाते.
सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली रस्ते, वीज, पाणी आणि विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरात लवकर एमआयडीसी उभा करणे,
महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना निवडून आणण्याचा निर्धार मतदारसंघातील नागरिकांनी केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज