टीम मंगळवेढा टाईम्स।
कचरेवाडी (ता. मंगळवेढा) परिसरातून २८ फेब्रुवारी रोजी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेली २१ वर्षीय तरुणी अखेर पोलिसांसमोर हजर झाली आहे.
विशेष म्हणजे, ही तरुणी बेपत्ता नसून तिने आपल्या २७ वर्षीय प्रियकरासोबत नरसोबावाडी (जि. कोल्हापूर) येथे विवाहबद्ध झाल्याचा धक्कादायक आणि तितकाच सुखद खुलासा केला आहे.

नेमकी घटना काय?
संबंधित तरुणी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ६:३० वाजता एखतपूर येथील अध्यापक महाविद्यालयात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत ती परतली नाही.

आपल्या मुलीचा सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने हवालदिल झालेल्या वडिलांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला होता.

पोलीस ठाण्यात ‘सरप्राईज’ एन्ट्री
या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक रवींद्र बाबर करत होते. पोलीस शोध घेत असतानाच, अचानक संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर पोलीस ठाण्यात हजर झाले. आपल्या प्रियकरासोबत नरसोबावाडी येथे धार्मिक विधी पार पाडून आपण विवाह केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

तरुणीचा कौल नवऱ्याच्या बाजूने
पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर तपास अधिकारी रवींद्र बाबर यांनी तरुणीचा जबाब नोंदवून घेतला. यावेळी तिला “तू वडिलांकडे जाणार की पतीकडे?” असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर, तिने पतीसोबतच संसार थाटण्याची इच्छा व्यक्त केली. मुलीचा निर्णय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी तिला तिच्या पतीसोबत सासरी जाण्यास परवानगी दिली.
या घटनेमुळे कचरेवाडी परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












