मंगळवेढा टाईम्स न्युज।
मंगळवेढा बसस्थानकावर हुन्नूर बसमध्ये चढत असताना एका प्रवाशी महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची बोरमाळ चोरण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान मागील महिन्यात एका महिलेचे येथूनचे दहा लाखाचे सोने चोरीला जावूनही अदयाप चोरटा मोकाटच असल्याने चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस भर पडत असल्याचे वास्तव आहे.

अशा दोघी सासूसुना तावशी पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी जनाबाई जगदाळे (वय ७०, रा. तावशी ता. पंढरपूर) दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता फिर्यादी व त्यांची सुन वैशाली येथून मंगळवेढा बसस्थानकावर आल्या.

त्या दोघी सासू सुना वैशालीचे माहेर पाठखळ असल्याने तेथे जाण्यासाठी हुन्नूर या बसमध्ये दुपारी १.१५ वाजता सुन बसमध्ये चढून तिने जागा पकडली. फिर्यादी ही बसमध्ये पाठीमागून चढत असताना गर्दी खूप होती

त्यावेळी फिर्यादीच्या गळ्यातील तीस मण्याची बोरमाळ अज्ञात चोरट्याने काढून घेतली. या दरम्यान फिर्यादीच्या लक्षात आले की, आपल्या गळ्यात बोरमाळ नाही, त्यानंतर सर्वत्र शोध घेतला मात्र कोठेही बोरमाळ मिळून आली नाही.

फिर्यादी व सुन पाठखळ येथे गेल्यानंतर सदरची घटना बहिणीने भाऊ युवराज सावत याला घडला प्रकार सांगीतल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान मागील महिन्यात सोलापूरहून आलेल्या एका महिलेचे दहा लाखाचे सोने बसमध्ये चढताना गायब झाले होते. याच्या शोधासाठी सोलापूरचे स्थानिक पोलीसही बसस्थानकावर आले होते मात्र त्यांना चोर पकडण्यात अपयश आल्याने पुन्हा चोरीचा प्रकार घडला आहे.

बसस्थानकावर दिवसभर पोलीस नसतात त्यामुळे चोरी सातत्याने घडत आहे. प्रवाशांचा जीव वाढत्याच चोऱ्यामुळे टांगणीला लागला असून बसने प्रवासा करावा की नाही असा प्रश्न त्यांच्या मनाला सतावत असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












