टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती स्व.दत्ताजीराव भाकरे यांच्या २६ व्या. पुण्यस्मरण दिनानिमित्त आज सोमवार दि.२४ मार्च रोजी सकाळी ९.०० वाजता
दत्ताजीराव भाकरे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आंधळगाव येथे धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक
प्रा.शिवाजीराव काळुंगे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांचेसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे.
अशी माहिती दामाजी शुगरचे माजी संचालक सुरेश भाकरे यांनी दिली आहे. तसेच याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा आंधळगाव येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
तरी आंधळगाव व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवक नेते दिनकर भाकरे यांनी केले आहे.
मंगळवेढा उपसा जलसिंचन योजनेला स्व. दत्ताजीराव भाकरे उपसा जलसिंचन योजना असे नाव द्यावे
मंगळवेढा दक्षिण भागात २४ गाव शेती पाणीपुरवठा योजनेला नुकतीच मंजुरी मिळाली. या तालुक्याचे लोकप्रतिनिधी मा. समाधानदादा अवताडे यांचे प्रयत्नातून ही योजना साकार झाली. गेल्या विधानसभा निवडणूक पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडवणीस यांनी या योजनेचे आंधळगाव चे माळरानावर स्वतः येऊन भूमिपूजन केले.
खऱ्या अर्थाने ही मूळ योजना चाळीस धोंडा पाणीपुरवठा योजना स्व. दत्ताजीराव भाकरे यांनी पंचायत समिती सभापती असताना, दामाजी फळ उत्पादक संस्थेच्या कार्यालयात बसून ‘नियोजित चाळीस धोंडा उपसा जलसिंचन योजना’ असा प्रस्ताव तयार करून शासन दरबारी दाखल केला होता.
पुढे लोकप्रतिनिधी म्हणून प्राध्यापक ढोबळे सर आले, नंतर प्रा. राम साळे आले. हा प्रस्ताव शासनाकडे धुळखात पेंडिंग पडला होता.
सन २००९ साली विधानसभा निवडणूक लागली त्यावेळी स्व भारत नाना भालके यांनी ही पाणीपुरवठा योजना निवडणूक प्रचारासाठी ३५ गाव उपसा जलसिंचन पाणीपुरवठा योजना तयार करून पुढे आणली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे विरुद्ध पाण्याच्या प्रचारावर निवडणूक जिंकली.
पुढे दोन वेळा स्वर्गीय भारत नानांनी अपक्ष आमदार, विरोधी पक्षा आमदार म्हणून कालावधी उपभोगला. ही योजना सतत चर्चेत ठेवल्याने अत्यावश्यक आणि लोकप्रिय झाली. हाच धागादोरा पकडून विद्यमान आमदार समाधान दादा यांनी ६९७ कोटी रुपये खर्चाची सुधारित २४ गाव उपसा
जलसिंचन पाणीपुरवठा योजना आणली. या योजनेला कालच्या २५-२६ आर्थिक बजेट मध्ये रुपये ५४ कोटी मंजूर करून घेतले आहेत.
आंधळगाव आणि आंधळगाव च्या परिसरातील बरेचसे लोक राजकीय दृष्ट्या भाकरे घराण्याला मानणाऱ्या पैकी आहेत. मा. दत्ताजीराव भाकरे असो, मा भगवानराव भाकरे असो त्यांचे स्नेह प्रेमी भाकरे मुळेच काँग्रेसला मानणारे होते. त्यामुळे या भागात काँग्रेसचे वर्चस्व होते.
आता भाकरे मध्येच बदल झाल्याने विद्यमान आमदार मा समाधान दादा यांचे नेतृत्वाखाली हा परिसर भाजपमय झाल्याचे चित्र दिसत आहे. सांगोल्यामध्ये माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा जलसिंचन योजना जशी कार्यान्वित केली
त्याच धर्तीवर आमदार समाधान दादा अवताडे यांनी मनावर घेऊन मंगळवेढा उपसा जलसिंचन योजनेला मूळ संकल्पना असलेले स्वर्गीय दत्ताजीराव भाकरे उपसा जलसिंचन योजना असे नामकरण करून मोठा दिलदारपणा दाखवावा हीच मा दत्ताजीराव भाकरे यांना श्रद्धांजली ठरेल, असे येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधीकडे साकडे घातले आहे.- नारायण माने…
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज