टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सामाना बरोबरीत सुटला आहे. जिल्ह्यातील अकरांपैकी तब्बल पाच जागा एकट्या भाजपने जिंकल्या आहेत, महाविकास आघाडीनेही पाच जागांवर विजय मिळविला आहे.
शेतकरी कामगार पक्षाने सांगोला हा बालेकिल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून दहा जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तब्बल चार उमेदवार एकट्या सोलापुरातून निवडून आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडीची गाडी जोरात होती. त्यातूनच आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटपापासून चुका केल्या.
जिंकण्याच्या स्थितीत असणारे मतदारसंघात वादग्रस्त आणि कठीण बनवले. त्यातूनच काही जागा महाविकास आघाडीने हातच्या घालवल्या. यामध्ये तीनही पक्षांचा समावेश आहे.
सोलापूर दक्षिण मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने यांची उमेदवारी भाजपसाठी डोईजड ठरली असती. त्या ठिकाणी शिवसेनेने उमेदवार जाहीर करण्याची घाई केली. काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या संवादातून त्यातून मार्ग काढता आला असता मात्र दोन्हीकडूनही परिपक्वता दाखवली गेली नाही.
तोच प्रकार पंढरपूरमध्ये घडला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार देऊनही भगीरथ भालके यांनी आमदार समाधान आवताडे यांना जोरदार टक्कर दिली.
या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल सावंत यांनी घेतलेली दहा हजार मते भालकेंच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहेत. या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत विसंवाद दिसून आला.
दरम्यान, विसंवादानंतरही महाविकास आघाडीने सोलापूरमध्ये महायुतीला जोरदार टक्कर दिली आहे. महाविकास आघाडीने पाच जागा जिंकल्या असून सांगोल्याची जागा मित्रपक्ष शेतकरी कामगार पक्षाने जिंकली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने तब्बल चार जागांचे योगदान दिले आहे.
पंढरपूर : समाधान आवताडे (8430 मतांनी विजयी, भाजप 1 लाख 25 हजार 163), भगीरथ भालके (1 लाख 16 हजार 733 मते काँग्रेस पराभूत)
सांगोला : डॉ. बाबासाहेब देशमुख (25 हजार 386 मतांनी विजयी, शेकाप 1 लाख 16 हजार 256), शहाजीबापू पाटील (90 हजार 870 मते शिवसेना पराभूत)
मोहोळ : राजू खरे (30202 मतांनी विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 1 लाख 25 हजार 838), यशवंत माने (95 हजार 636 मते राष्ट्रवादी काँग्रेस, पराभूत)
माढा : अभिजीत पाटील (30621 विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 1 लाख 36 हजार 559 मते), रणजितसिंह शिंदे (1 लाख 05 हजार 938 अपक्ष पराभूत)
माळशिरस : उत्तम जानकर (13147 मतांनी विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 1 लाख 21 हजार 713), राम सातपुते (1 लाख 08 हजार 566 भाजप, पराभूत)
सोलापूर शहर मध्य : देवेंद्र कोठे (48850 मतांनी विजयी, भाजप 1 लाख 10 हजार 278 मते), फारूक शाब्दी (61 हजार 428 मते एमआयएम पराभूत)
अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी (49572 मतांनी विजयी, भाजप 1 लाख 48 हजार 105 मते), सिद्धाराम म्हेत्रे (98 हजार 533 मते काँग्रेस, पराभूत)
सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख (77 हजार 127 मतांनी विजयी, भाजप 1लाख 16 हजार 932 मते ), अमर पाटील (39805 मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पराभूत)
सोलापूर शहर उत्तर : विजयकुमार देशमुख (54583 मतांनी विजयी, भाजप 1लाख 17 हजार 215), महेश कोठे (62 हजार 632 मते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पराभूत)
बार्शी : दिलीप सोपल (6 हजार 472 विजयी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1लाख 22 हजार 694 ), राजेंद्र राऊत (1 लाख 16 हजार 222 शिवसेना, पराभूत
करमाळा : नारायण पाटील ( 16085 विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 96 हजार 091), संजय शिंदे (80 हजार 006 मते पराभूत अपक्ष)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज